आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी चहा करताना स्वयंपाक घराचे छत अंगावर पडल्याने गृहिणीचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत पडल्यानंतर उघडे पडलेले धनसिंग पाटील यांचे घर. - Divya Marathi
छत पडल्यानंतर उघडे पडलेले धनसिंग पाटील यांचे घर.
जळगाव - स्वयंपाक घरात सकाळी चहा करीत असतानाच छत कोसळल्याने गृहिणी जागीच दगावल्याची घटना बुधवारी सकाळी प्रिंपाळा भागात घडली. सुमारे तीन फूट जाडीचे हे छत अंगावर पडल्याने त्या महिलेची किंकाळीही ऐकू येऊ शकली नाही. हे दुर्दैव. बुधवारी सकाळी ६.१० वाजता ही घटना घडली. सुमित्रा अशोक पाटील (वय ५३) असे मृत गृहिणीचे नाव आहे. विशेष म्हणजे घरातील महिलेच्या अंगावर छत पडण्याची पाटील कुटुंबीयांमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सुमित्रा यांची चुलत सासू यांच्यासोबतही अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत त्या बचावल्या. 
 
धनसिंग पाटील हे पत्नी सुमित्रा, वद्ध आई भिकुबाई, मुलगी सोनी यांच्यासोबत कुंभारवाड्यात राहतात. दरम्यान, पाटील कुटुंबीयांची सावखेडा शिवारात शेती आहे. मंगळवारी रात्री धनसिंग पाटील हे अंगणात तर त्यांच्या पत्नी, आई मुलगी हे तिघे घरात होते. बुधवारी सकाळी वाजता सर्व कुटुंब झोपेतून जागे झाले. सुमित्रा पाटील स्वयंपाक खोलीत चहा बनवण्यासाठी गेल्या. तर सोनी भिकुबाई देखील त्यांच्या शेजारीच होत्या. काही मिनिटांनी भिकुबाई सोनी पुढच्या खोलीत येण्यासाठी निघाल्या. दोन्ही जणी दारात असतानाच सेकंदात स्वयंपाक खोलीचे मातीचे छत खाली कोसळले. छताला आधार देणाऱ्या लाकडी बल्ल्यांमुळे भिकुबाई सोनी यांच्या हाताला किरकोळ खरचटले. पण सुमित्रा पाटील ह्या पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबल्या गेल्या. छत कोसळण्याच्या आवाजामुळे शेजारच्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली. स्वयंपाक खोलीत शांतता झाली होती. मातीचा ढिगाऱ्या खाली दबल्या गेलेल्या सुमित्रा यांची किंकाळीसुद्धा येऊ शकली नाही. भिकुबाई आणि सोनी यांनी मागे वळून पाहता तोवर सुमित्रा पाटील दिसेनाशा झाल्या होत्या. 
 
धाडकन आवाज झाल्याने धनसिंग पाटलांनी घरात धाव घेतली. काही सेकंदात गावातील शंभर ते दीडशे तरुणांनी सुमित्रा पाटलांचा शोध घेणे सुरू केले. ढिगाऱ्यात त्या कोणत्या कोपऱ्यात दाबल्या गेल्या याचा काहीच अंदाज नव्हता. पावसामुळे छतावरील माती ओली झालेली असल्याने खाली पडलेल्या ढिगाऱ्यातील माती घट्ट झाली होती. तरुणांनी फटाफट ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले होते. अवघ्या १० बाय १२ च्या खोलीतून ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या सुमित्राबाई तब्बल एका तासाने आढळून आल्या. तासभर दाबल्या गेल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. हे पाहून कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी देखील आक्रोश केला. बाहेर काढल्यानंतर सुरुवातीला त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी पिंप्राळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सुमित्रा पाटील यांच्या पश्चात पती धनसिंग, मुलगी सोनी, सासू भिकुबाई दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्या अत्यंत मनमिळावू होत्या. 

मदतीबाबत शासनाला पाठवणार अहवाल 
> पिंप्राळ्यातील घटनेबाबत जिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाइकांची विचारपूस केली. तलाठी कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा केला. शासन निकषाप्रमाणे महिलेच्या नातेवाइकांना मदत देण्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.
अमोल निकम, तहसीलदार 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ...तर वाचल्या असत्या सुमित्रा पाटील आणि वर्षांपूर्वी भिकुबाईंच्या सासू वाचल्या होत्या...
बातम्या आणखी आहेत...