आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट‌्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर; नगरसेवक पुत्रावर गुन्हा, वाचा काय आहे तक्रारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात बसलेल्या महिला. - Divya Marathi
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात बसलेल्या महिला.
धुळे - माजी महापौर जयश्री अहिरराव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनाेज माेरे यांच्या पत्नी भारती माेरे यांच्याबद्दल व्हाॅट‌्सअॅपवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याने नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचे पुत्र देवा उर्फ देवेंद्र चंद्रकांत साेनार याच्याविरुद्ध सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनाेज माेरे यांनी तक्रार दिली अाहे. दरम्यान, याप्रकरणी माजी महापाैर जयश्री अहिरराव यांच्याकडूनही अाझादनगर पाेिलसांत तक्रार दिली जाणार असल्याची माहिती देण्यात अाली. दरम्यान गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी दुपारी शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. त्याचबरोबर उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांना निवेदन देण्यात आले. 
 
माजी महापाैर जयश्री अहिरराव अाणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनाेज माेरे यांच्या पत्नीबद्दल ‘बाेला धुळेकर विचार मांडा’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर अपलोड झाला होता. या प्रकरणी देवा उर्फ देवेंद्र साेनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यानंतर उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या वेळी माजी महापाैर जयश्री अहिरराव, महापाैर कल्पना महालेे, प्रा. सुवर्णा शिंदे, ज्याेती पावरा यांच्यासह स्थायी समिती सभापती कैलास चाैधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनाेज माेरे, कमलाकर अहिरराव आदी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर काही महिला पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागण्यासाठी शहर पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी दाखविली ; परंतु महिलांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. त्यामुळे दुपारी दाेन तास महिला शहर पाेलिस ठाण्यात बसून होत्या. काही महिलांनी तर पोलिस निरीक्षक डी. व्ही. वसावे यांच्या दालनात ठाण मांडले हाेते. याप्रकरणी वकिलांचाही सल्ला घेण्यात अाला. दरम्यान, सायंकाळी उशिराने माजी महापाैर जयश्री अहिरराव ह्या अाझादनगर पाेिलस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्याबाबत येणार असल्याची माहिती पाेिलसांकडून देण्यात अाली. त्यामुळे अाणखी एक गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता अाहे. 
 
शिष्टमंडळातयांचा हाेता समावेश : निवेदनदेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात मीनल पाटील, मंगला माेरे, नगरसेविका कल्पना बाेरसे, माधुरी अजळकर, चंद्रकला जाधव, कशीश उदासी, माधुरी बडगुजर, शशिकला नवले, अवंता माळी, कलाबाई बडगुजर, भारती अहिरराव, दीपाली अहिरराव, मनीषा वाघ, वंदना पवार, मंगला पगारे, वैशाली सगरे, लता वाल्हे, अारती पवार, भारती गवळी, शाेभा चाैधरी, यशाेदा गवळी, कविता चाैधरी, सुरेखा माेरे, रेखा माेरे, कमलबाई चाैधरी, मीना भाेसले, मनीषा सगरे, कविता चाैधरी, केवळबाई साळुंखे, मनीषा साेनवणे, रत्नप्रभा वाघ, अारती भाेई, सुमन चाैधरी आदींचा समावेश होता. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, निवेदनातून केला आरोप आणि वाचा काय आहे तक्रारीत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...