आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीच्या विरोधातील ठराव गोंधळातच मंजूर, बहुमताच्या जोरावर संमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पतसंस्थांमध्ये ठेवी अडकून पडल्या आहेत, असे सांगत नोटबंदीच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आघाडीच्या सदस्यांनी ठराव मांडला. शिवसेनेनेही सुरात सूर मिसळला. केवळ भाजपच्या पाच शिलेदारांनी ठरावास विरोध केला. बहुमताच्या जोरावर गोंधळातच हा ठराव मंजूर होत असल्याचे
दिसताच भाजपच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी सभात्याग केला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती मीरा चकोर, नंदा वारे, शरद नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदी उपस्थित होते.
केेंद्रात, तसेच राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीने भाजप सरकारची नोटबंदीच्या मुद्द्यावर कोंडी केली आहे. थंडीचा पारा घसरला असताना नोटबंदीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कॅशलेस व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा विषय लेखा वित्त विभागाने या सभेत ठेवला होता. त्यानंतर नोटबंदीच्या मुद्द्यावर वादळी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सरकारचा नोटबंदीचा
निर्णय फसला असल्याची टीका करत सरकारच्या धोरणावर मार्मिक शब्दांत हल्ला चढवला.
सरकारचा निर्णय
नोटबंदीचा नव्हे, तर नोट बदली करण्याचा होता. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला. जिल्हा बँकेतील ठेवी वेळेत मिळत नाहीत, असा सूर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने अळवला. नोटबंदीच्या विरोधात ठराव घेऊन निषेध करण्याची सूचना काँग्रेस सदस्यांनी मांडली. या सूचनेला अनुमोदन देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची चढाओढ लागली होती. भाजपच्या सदस्य काकडे यांनी सरकारविरोधी ठराव घेण्यास विरोध केला. तथापि, सत्ताधारी गटाचे सर्व सदस्य जागेवर उभे राहून ठराव घेण्याचा आग्रह धरू
लागले. अध्यक्ष गुंड यांनी काकडे यांना त्यांची भूमिका मांडू द्या, नंतर ठराव घेऊ असे सांगितले. परंतु बहुसंख्य सत्ताधारी ठराव घेण्याच्याच बाजूने होते. अशा परिस्थितीत काकडे, भाजपचे बाजीराव गवारे, दत्तात्रेय सदाफुले, मंदा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मोहन पालवे या शिलेदारांनी सरकारची बाजू लावून धरली.
काकडे म्हणाल्या, नोटबंदीचा निर्णय योग्य होता की नाही, हे जनतेने नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांतून दाखवून िदले आहे. तुम्ही घेत असलेल्या या ठरावाला आमचा पाठिंबा नाही. अखेर गोंधळातच नोटबंदी विरोधातील ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सदस्य काकडे यांनी सभात्याग केला.
खात्यात पैसे देण्याच्या धोरणाला विरोध
वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेची खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. या धोरणावरही सदस्यांनी आगपाखड करत वैयक्तिक योजनांचा निधी सार्वजनिक कामांसाठी वळवण्याबाबत विचार मांडण्यात आला. त्यामुळे वैयक्तिक लाभार्थी यंदा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सभेत गुरुवारी नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी सदस्यांनी ठराव घेण्याची मागणी केली. भाजप सदस्यांनी त्याला विरोध केल्याने गोंधळ झाला.
देशी दारू आणि कॅशलेस
नवरा-नवरीपाया पडायला आल्यानंतर आशीर्वाद म्हणून रोख पैसे देण्याची परंपरा आहे. कॅशलेस झाल्यानंतर त्यांना मोबाइल नंबर विचारायचा का? देशी दारू, हातभट्ट्यांवर कॅशलेस कसे करणार? आहेर स्वीकारण्यासाठी कॅशलेस असल्याचे पत्रिकेवरही छापावे लागेल का? असा सवाल नोटबंदीविरोधात अॅड. सुभाष पाटील यांनी केला.
वासरात लंगडी गाय
कॅशलेस व्यवस्था करण्यात येणाऱ्या असंख्य अडचणी मांडण्यात आल्या. या अडचणी कशा सोडवणार, असा सवाल मुख्य लेखा वित्त अधिकारी अरुण कोल्हे यांना केला गेला. त्यावर कोल्हे यांनी मलाही फारसे माहिती नाही, माझी अवस्था वासरात लंगडी गाय शहाणी असल्यासारखीच आहे, असे सांगितले.
शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे
शिक्षण विभागाकडून रोस्टर मंजुरीसाठी पाठवण्यात झालेला विलंब, तसेच गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या फायली प्रलंबित ठेवल्याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना चांगलेच फैलावर घेतले. सभापती संदेश कार्ले यांनी शासनाचा आदेश दाखवा, असा संतप्त सवाल केला.
बोगस डॉक्टरांवर लगेच गुन्हे नोंदवा
जिल्ह्यातील २७ बोगस डॉक्टरप्रकरणी वादळी चर्चा झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्यांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर झाले. अध्यक्ष गुंड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांची कडक शब्दांत कानउघाडणी करून बोगस डॉक्टरांवर लगेच गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले.
कला केंद्रांमध्ये काय करणार?
भाजपचे संभाजी पालवे यांनी नोटबंदीचे समर्थन केल्यानंतर राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांनी पालवे यांना प्रतिप्रश्न केला. कला केंद्रात गेल्यानंतर कॅशलेस कसे करायचे ते पालवेंनी सांगावे. तुम्ही सहमती द्या किंवा नका देऊ. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात ठराव होणारच, असे त्यांनी ठासून सांगितले. नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पतसंस्थांमध्ये ठेवी अडकून पडल्या आहेत, असे सांगत नोटबंदीच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आघाडीच्या सदस्यांनी ठराव मांडला. शिवसेनेनेही सुरात सूर मिसळला. केवळ भाजपच्या पाच शिलेदारांनी ठरावास विरोध केला. बहुमताच्या जोरावर गोंधळातच हा ठराव मंजूर होत असल्याचे दिसताच भाजपच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी सभात्याग केला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती मीरा चकोर, नंदा वारे, शरद नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदी उपस्थित होते.केेंद्रात, तसेच राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीने भाजप सरकारची नोटबंदीच्या मुद्द्यावर कोंडी केली आहे. थंडीचा पारा घसरला असताना नोटबंदीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कॅशलेस व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा विषय लेखा वित्त विभागाने या सभेत ठेवला होता. त्यानंतर नोटबंदीच्या मुद्द्यावर वादळी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सरकारचा नोटबंदीचा निर्णय फसला असल्याची टीका करत सरकारच्या धोरणावर मार्मिक शब्दांत हल्ला चढवला.
सरकारचा निर्णय
नोटबंदीचा नव्हे, तर नोट बदली करण्याचा होता. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला. जिल्हा बँकेतील ठेवी वेळेत मिळत नाहीत, असा सूर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने अळवला. नोटबंदीच्या विरोधात ठराव घेऊन निषेध करण्याची सूचना काँग्रेस सदस्यांनी मांडली. या सूचनेला अनुमोदन देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची चढाओढ लागली होती. भाजपच्या सदस्य काकडे यांनी सरकारविरोधी ठराव घेण्यास विरोध केला. तथापि, सत्ताधारी गटाचे सर्व सदस्य जागेवर उभे राहून ठराव घेण्याचा आग्रह धरू
लागले. अध्यक्ष गुंड यांनी काकडे यांना त्यांची भूमिका मांडू द्या, नंतर ठराव घेऊ असे सांगितले. परंतु बहुसंख्य सत्ताधारी ठराव घेण्याच्याच बाजूने होते. अशा परिस्थितीत काकडे, भाजपचे बाजीराव गवारे, दत्तात्रेय सदाफुले, मंदा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मोहन पालवे या शिलेदारांनी सरकारची बाजू लावून धरली. काकडे म्हणाल्या, नोटबंदीचा निर्णय योग्य होता की नाही, हे जनतेने नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांतून दाखवून िदले आहे. तुम्ही घेत असलेल्या या ठरावाला आमचा पाठिंबा नाही. अखेर गोंधळातच
नोटबंदी विरोधातील ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सदस्य काकडे यांनी सभात्याग केला.

खात्यातपैसे देण्याच्या धोरणाला विरोध
वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेची खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. या धोरणावरही सदस्यांनी आगपाखड करत वैयक्तिक योजनांचा निधी सार्वजनिक कामांसाठी वळवण्याबाबत विचार मांडण्यात आला. त्यामुळे वैयक्तिक लाभार्थी यंदा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...