आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांच्या स्वयंसिद्धांनी केली नोटबंदीवर मात, नव्या नोटांच्या सुट्यांचा प्रश्न सोडवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटबंदी असताना स्वयंसिद्धा प्रदर्शनाला मात्र गर्दी होत आहे. - Divya Marathi
नोटबंदी असताना स्वयंसिद्धा प्रदर्शनाला मात्र गर्दी होत आहे.
धुळे - देवपुरात पंचायत समितीजवळ भरलेल्या स्वयंसिद्धा महिला बचत गटाच्या प्रदर्शन विक्रीला अपेक्षित प्रतिसाद लाभत असला तरी नोटबंदीचा परिणामही काहीअंशी जाणवत आहे. त्यामुळे काही ग्राहकांकडून स्वॅप मशीनच्या विचारणेसोबत जुन्या ५०० १००० रुपयांच्या नोटांचीही विचारणा होऊ लागली आहे. प्रदर्शनातील महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.
स्वयंसिद्धातर्फे सध्या वाडीभोकर रोडला लागून महिला बचत गटांनी हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन विक्री सुरू आहे; परंतु यंदा मात्र प्रदर्शनात अधिक महिला बचत गट सहभागी झालेले नाही. केवळ १०० ते १२५ महिला बचत गटांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामध्ये संसाराेपयोगी ठरणाऱ्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. तथापि महिना उलटूनही सुरू असलेले नोटबंदीचे परिणाम या प्रदर्शन विक्रीवर दिसून येत आहे. त्यामुळेच प्रदर्शनात खरेदीसाठी येणारे बहुतांशी ग्राहक बचत गटांकडे स्वॅप मशीन आहे का?, अशी विचारणा करतात. यात अर्थातच पुरुष ग्राहकांची संख्या अधिक आहे. मुळात बचत गटाचा आर्थिक व्यवहार छोटा असताना त्यांच्याकडे स्वॅप मशीन असणे तेवढेच कठीण आहे. संबंधित बचत गटाचे पदाधिकारीही तेवढ्याच केविलवाणेपणे त्याला नकार देतात. एवढेच नव्हे तर काही ग्राहकांनी चक्क जुन्या ५०० १००० रुपयांच्या नोटा पुढे केल्या. तर काही जणांनी २००० रुपयांची नोट पुढे केली. असे अनुभव प्रदर्शनात स्टॉल मांडलेल्या बहुतांशी महिला बचत गटांना आला आहे. तथापि यंदाही खरेदीला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ग्राहकांकडून १००, ५०, २०, १० रुपयांच्या स्वरूपात येणाऱ्या चलनामुळे मात्र फारशी अडचण उदभवत नसल्याची माहिती एका बचत गटाच्या पदाधिकाऱ्याने दिली. दरम्यान, शुक्रवार (दि.९)पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा उद्या मंगळवारी दुपारी समारोप हाेईल.

ग्राहक आहेत सुज्ञ
-स्वॅपमशीनबद्दलकाही ग्राहकांनी विचारणा केली. याशिवाय जुन्या नोटा घेतात का असा प्रश्नही काहींनी विचारला; परंतु बहुतांशी ग्राहक सद्य:स्थिती जाणतात. त्यामुळे इतरांकडून खरेदी विक्री करताना फारशी अडचण आली नाही.
-स्नेहलकुलकर्णी, सुमन,सुलक्षणा गट
बातम्या आणखी आहेत...