आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शेतकर्‍यांचा चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा, कर्जमाफीसह इच्छा मरणाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - मागील पंधरा दिवासापासून इच्छा मरणाची परवानगी मिळावी म्हणून चोपडा तालुका कृती समितीने एकूण लहान मोठ्या तीस गावांमध्ये सभा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन केले होते.मात्र आजच्या शेतकऱ्याच्या फायद्या साठी काढण्यात आलेल्या मोर्चालाच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.मोर्च्यांची वेळ सकाळी नऊ वाजेची दिली होती,मात्र त्या वेळेत केवळ कृती समितीचे पदाधिकारी आनंदराज लॉन्स शेजारी उपस्थित होते.वेळोवेळी कृती समितीचे संयोजक संजीव सोनवणे यांनी आवाहन केले की,उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या खिशातील मोबाईल काढून दोन दोन शेतकऱ्यांना फोन लावून मोर्चात बोलवा,मात्र त्यासाठी दीड तास उशिरा मोर्चा काढावा लागून शेवटी जेमतेम नव्वद शंभर शेतकऱ्याच्या उपस्थितीत ,दोन बैलगाडी व नवद शँभार शेतकऱ्यांनी चोपडा धरणगाव रोड वरील शासकीय विश्राम गृह ते चोपडा तहसील कार्यलयावर आजचा मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्याला नेहमी प्रमाणे पोलीस बंदोबस्त होताच,मागे पोलिसांची पिंजरा गाडी देखील चालत होती.

या मोर्चात शेतकरी कृति समितीचे पदाधिकारी एस बी पाटील, संजीव सोनवणे,डॉ रविन्द्र निकम,भागवत महाजन,संजीव बाविस्कर,किरणसिंग राजपूत,प्रफुल्लसिंग राजपूत,नितिन निकम,वसंत पाटील, भगवान पाटील,अजित पाटील,हिरालाल पाटील,माजी सभापती विनायक चव्हाण,बाजार समितीचे संचालक धनंजय पाटील,गिरीश पाटील,अनिल पाटील,अम्बादास पाटील,मधुकर बाविस्कर,संदीप महाजन,जगदीश पाटील,डॉ सुभाष देसाई,पंकज पाटील,ज्ञानेश्वर धनगर,नवनीत पाटील,विक्की सपकाळे,गोटू पाटील,यांचेसह एकूण नव्वद ते शंभर शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. ,बाजार पेठेत काही शेतकऱ्यांनी मोर्चात प्रवेश करून तहसील कार्यलवर थोडी संख्या वाढली होती.
 
शेतकऱ्यामध्ये उदासीनता:-कर्जमुक्ती मिळावी,वीज बिल माफ व्हावे,स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे,आम्हला इच्छा मरणाची परवानगी साठी परवानगी मिळाली पाहिजे,या प्रमुख मागणीसाठी आज शासकीय विश्राम गृह ते तहसील कार्यलयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.मोर्चातील आयोजक संजीव सोनवने हे वारंवार शेतकरी आले नाही म्हणून कडक शब्दात दुःख व्यक्त केले.तालुक्यातील शभर गावांपैकी शेतकरी कृती समितीने मागील दहा बारा दिवसापासून एकूण तीस गावांना लहान मोठ्या सभा घेऊन आजच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन एस बी पाटील,संजीव सोनवाने,डॉ रवींद्र निकम यांनी केल्यावरही आजच्या मोर्च्यांत केवळ बागायती शभर शेतकरी उपस्थित होते.
 
या दिल्या घोषणा:-आज काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी चोपडा शहरात "मरना रे मरना शेतकरी मरना,कोण म्हणतं देणार नाही,घेतल्या शिवाय देणार नाही,या सरकारचे करायचे काय,खाली डोकं वरती पाय,कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे,वीज बिल माफ झालेच पाहिजे,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे,आम्हाला इच्छा मरणाची परवानगी मिळालीच पाहिजे, अश्या विविध घोषणांनी चोपडा शहर दणाणून सोडले होते.
 
तहसीलवर मांडली भूमिका:-कृती समितीचे अध्यक्ष एस बी पाटील,यांनी चोपडा तहसील कार्यलयावर आपली भूमिका मांडतांना सांगितले की,शेतकऱ्याच्या आत्त्महत्या का होतात हे मोदी सरकारला कळत नाही,सरकारने खताची सफसेडी कमी केली.कर्मचाऱ्यांचे पगार वाढविले,त्याचे दुःख आम्हाला नसून शेतकऱयांना मारण्याचे षडयंत्र चालविले असून कलम १४ व २१ अनव्ये न्याय द्यावे.या देशातील शेतकऱ्यांनी जगण्याची हक्क गमाविला असून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी .तसेच १ जून पासून चोपडा तालुक्याचे शेतकरी संपावर जाणार असल्याचे
एस बी पाटील यांनी सांगितले.
 
सुप्रीम कोर्टाच्या नायमूर्तींना दिले निवेदन:-आजचे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या इच्छा मरणाची परवानगी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी चोपडा तहसील कार्यलयावर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तहसीलदार दीपक गिरासे याना निवेदन देण्यात आले,हे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तहसीलदार गिरासे मुख्य न्यायमूर्ती दिल्ली यांच्या कडे पाठवतील.
 
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो अाणि व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...