आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे CRIME: विवाहितेचा छळ, पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
धुळे : दाेन लाखांसाठी सासरच्या लाेकांकडून विवाहितेचा छळ करण्यात अाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पतीसह सासरच्या चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
मनीषा राहुल पाटील (३२) रा. साईबाबा सायबर कॅफेसमाेर मालपूर चाैफुली, दाेंडाईचा यांनी पाेलिसांत तक्रार दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, नाेव्हेंबर २०१५ ते १५ एप्रिल २०१६ या काळात जळगाव येथील रामेश्वर काॅलनीतील प्लाॅट नं. येथील सासरी पती राहुल यशवंत पाटील, सासू विमलबाई यशवंत पाटील, दीर किरण यशवंत पाटील, पवन यशवंत पाटील यांनी दाेन लाखांची मागणी करीत अापल्याला मारहाण, शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अापल्याकडील साेन्याचे दागिनेही काढून घेतले. तिच्या तक्रारीवरून दाेंडाईचा पाेलिस ठाण्यात चाैघांविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला अाहे. तपास हेडकाॅन्स्टेबल सैंदाणे करीत अाहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने तरुणाचे दोन लाख रुपये लुटले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...