आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढीच्या प्रस्तावात फेरबदल; ११ गावांचे नकाशे शासनाला सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या हद्दवाढीत यापूर्वी १६ गावे प्रस्तावित होती. या विषयीचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या हद्दीत चारच गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता; परंतु आता या प्रस्तावात पुन्हा फेरबदल झाला आहे. हद्दवाढीत नव्याने ११ गावे प्रस्तावित करण्यात आली असून, नकाशे शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 
 
महापालिकेची स्थापना होऊन १४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत शहराच्या चारही दिशांना मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. शहराला लागून असलेले वलवाडी, गोंदूर, महिंदळे, वाडीभोकर, चितोड आदी गावे आता शहरातच आल्याची स्थिती आहे. दुसरीकडे महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी हद्दवाढ करणे आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्यास मालमत्ता, पाणीपट्टी करात वाढ होईल. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवता येतील, असे गृहीत धरून महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या १६ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठवला होता. १६ गावांचे एकूण १०३.८८ चौरस किलोमीटर होते. मात्र, क्षेत्रफळ जास्त असल्याने सुविधा पुरविणे शक्य होणार नसल्याने हद्दवाढीतील गावालगत असलेले गावठाण बिनशेती क्षेत्राचाच हद्दवाढीत समावेश करावा, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा नवीन नकाशे महापालिकेने तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ते शासनाकडे सादर केले. 

मध्यंतरीच्या काळात महापालिकेच्या हद्दीत १६ गावे समाविष्ट करणे भौगोलिकदृष्ट्या शक्य होणार नाही असे शासनाने स्पष्ट करत महिंदळे, चितोड, बाळापूर वलवाडी या चार गावांचाच समावेश हद्दवाढीत करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा ११ गावांचा हद्दवाढीत समावेश करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. त्यासाठी या ११ गावांचे गावठाण बिनशेती असलेल्या क्षेत्रफळाचे नकाशे संबंधित कागदपत्र शासनाने मागविले आहे. त्यानुसार नव्याने हद्दवाढीचा नकाशा तयार करून तो शासनाला पाठवण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होऊन हद्दवाढीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. 

गावांनी घेतली हरकत 
प्रस्तावित हद्दवाढीत ज्या गावांचा समावेश होणार आहे. त्या गावांनी या निर्णयाला यापूर्वीच नकार दिला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करून महापालिकेच्या हद्दीत जाण्यास विरोध केला आहे. तर शासनाने मागवलेल्या हरकती सूचनेतही गावांनी त्यांच्या हरकती जिल्हा प्रशासनाकडे नांेदविल्या असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हद्दवाढीवर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. 

हद्दवाढ १०८ चौरस कि.मी. 
हद्दवाढ झाल्यास मनपाचे क्षेत्रफळ ६२.६१ चौरस किलोमीटरने वाढणार आहे. हद्दवाढीतील प्रस्तावित ११ गावांचे बिनशेती गावठाण क्षेत्रफळ असे : वलवाडी ८.३२, भोकर ८.२४, महिंदळे ६.९७, नकाणे ४.८७, अवधान ४.६०, चितोड १.६८, नगाव ६.४६, वरखेडी २.६०, बाळापूर ६.५९, मोराणे ८.१९, पिंप्री ३.९९. महापालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ ४६.४६ चौरस किलाेमीटर आहे. त्यात हद्दवाढ झाल्यास ते १०८.९७ चौरस िकलोमीटर होणार आहे. 

} पूर्वी ही होती १६ गावे 
महापालिकेच्याहद्दवाढीत पूर्वी वलवाडी, भोकर, नगाव, बिलाडी, कुंडाणे, वरखेडी, बाळापूर, फागणे, वडजाई, पिंप्री, अवधान, लळिंग, चितोड, महिंदळे, मोराणे, नकाणे आदी गावे होती. 

}आता ११ गावांचा समावेश 
आताशासनाला हद्दवाढीत ११ गावांचा समावेश करावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. या अकरा गावांमध्ये वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, बाळापूर, माेराणे पिंप्री या गावांचा समावेश अाहे. 

}ही गावे वगळली 
हद्दवाढीतूनबिलाडी, कुंडाणे, लळिंग, फागणे, वडजाई ही गावे वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर अवधानमधून औद्याेगिक क्षेत्रही वगळण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दवाढीसाठी २०१३ पासून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...