आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते विकासासाठी १५ हजार काेटींना केंद्राकडून मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्वातंत्र्यानंतर प्रथमच धुळे लाेकसभा मतदारसंघासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी १५ हजार काेटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे ते अाैरंगाबाद या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले की, धुळे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ जाताे. त्याचे चाैपदरीकरण हाेणे गरजेचे अाहे. या कामाला चालना मिळावी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत महामार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार या महामार्गाचे भूमिपूजन शनिवारी (िद.५) दुपारी एक वाजता पोलिस कवायत मैदानावर हाेणार अाहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ हा धुळे ते अाैरंगाबादपर्यंत १५४ किलाेमीटर अाहे. तो गल्ले बाेरगाव, कन्नड, चाळीसगाव, मेहुणबारे मार्गे जातो. या महामार्गावर अाैरंगाबाद, चाळीसगाव, मेहुणबारे, गरताड, धुळे असे सहा बायपास करण्यात येणार अाहेत. तसेच बससाठी ६० ट्रकसाठी सहा थांबे असतील. कन्नड घाटात ११.५ किलाेमीटर लांबीचा बाेगदा तयार केला जाणार अाहे. या कामावर चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित अाहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २७ महिन्यांचा कालावधी निश्चित केला अाहे. या महामार्गाच्या कामासाठी हजार १३१ काेटी रुपये खर्च अाहे. त्याचबरोबर सुरत ते नागपूर या महामार्गाचे कामही सुरू झाले आहे.

या कामाची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली अाहे. ती चिखली ते तरसाेद, तरसाेद ते फागणे महाराष्ट्र ते गुजरात सीमा अशी आहे. त्यापैकी चिखली ते तरसाेद हा टप्पा ६३ किलोमीटरचा असून, त्यात तीन मुख्य पूल १८ लहान पूल अाहेत. वरणगाव जवळ बायपास नशिराबाद येथे टाेल प्लाझा अाहे. या कामावर ९४८ काेटी रुपये खर्च होणार आहे. तरसाेद ते फागणे हा रस्ता ८७ किलाेमीटर असून, त्यावर माेठे पूल २९ लहान पूल अाहेत. पाराेळा, जळगाव, मुकटी असे तीन बायपास दाेन रेल्वे पूल अाहेत. या कामावर ९४० काेटींचा खर्च अपेक्षित अाहे.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत अार्वी ते शिरूड या रस्त्याचे काम प्रगतिपथावर अाहे. वीस किलाेमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी वीस काेटींचा खर्च येणार अाहे. तसेच गाेंदूर, नगाव, माेराणे या बायपासचे कामही प्रगतिपथावर अाहे. हा रस्ता १३.५ किलोमीटर आहे. या कामावर १५ काेटी खर्च होणार आहेत. मुडावद येथे पुलाचे काम मंजूर झाले असून त्यावर १० काेटींचा खर्च होणार आहे.

सीमा सांभाळण्यास देश सक्षम...
पाकिस्तानकडून हाेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यावर बाेलताना मंत्री डाॅ. भामरे यांनी सांगितले की, सर्जिकल स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला चाेख उत्तर देण्यात अाले अाहे. जनतेची भावना युद्ध करावी, अशी असली तरी ते काेणालाही परवडणारे नाही. मात्र सीमा सांभाळण्यास देश सक्षम अाहे. अाताच्या सरकारकडून सैन्याला माेकळीक देण्यात अाली अाहेे. समाेरून गाेळीबार झाल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच भारतीय सैन्याला काेणीही कमी लेखू नये असेही ते म्हणाले.

रेल्वेमार्गाचा राज्याला फायदा
मंत्रीडॉ. भामरे यांनी सांगितले की, मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाल्यानंतर त्यासाठी सर्वात माेठी अडचण निधीची हाेती. या मार्गासाठी दहा हजार काेटींची गरज आहे. या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने हजार काेटी रेल्वेच्या सार्वजनिक प्रकल्प पाेर्ट मंत्रालयाने पाच हजार काेटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे दिला. त्यामुळे हा मार्ग साकारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. इतके नव्हे तर मनमाड-जेएनपीटी, नाशिक मार्गे स्वतंत्र मार्ग केला जाणार अाहे. त्याचा फायदा राज्याला हाेणार अाहे.
पाणी योजनेसाठी बैठक
मंत्रीडॉ. भामरे यांनी सांगितले की धुळे लोकसभा मतदारसंघातील पाणी, महामार्गाचे चाैपदरीकरण अादी प्रश्न साेडवण्यास प्राधान्य दिले जात आहे. दिल्ली-मंुबई इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरचा प्रश्नही मार्गी लावणार आहे. केंद्र शासनाच्या निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा याेजनेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...