आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरच्या प्रकल्पातून १,२५८ मेगावॅट वीजनिर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून रविवारी हजार २५८ मेगावॅट उच्चांकी वीजनिर्मिती करण्यात आली. राज्यातील औद्योगिक वापर रविवारी कमी असतानाही विजेची मागणी तब्बल १५ हजार ८१० मेगावॅटपर्यंत पाेहाेचली हाेती.

दीपनगर केंद्रातील चारही संचांतून रविवारी समाधानकारक वीजनिर्मिती झाली. राज्याला उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अधिक प्रमाणात विजेची गरज भासत आहे. रविवारी औद्योगिक वापर कमी असल्याने मागणी १३ ते १४ हजार मेगावॅटच्या अात असते. मात्र, सध्या घरगुती विजेचा वापर वाढल्यामुळे ही मागणी वाढली आहे. महावितरणने रविवारी सरासरी १५ हजार ८१० मेगावॅटची मागणी नोंदवली तर मुंबई उपनगरांसह राज्याला १८ हजार ७१ मेगावॅट विजेची गरज होती. या तुलनेत राज्यात केवळ १२ हजार १२६ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रापेक्षाही अधिक वीजनिर्मिती रविवारी दीपनगर केंद्राने केली. त्यात संच क्रमांक दोनमधून १३९, तीनमधून १६४, चारमधून ४७९ आणि संच पाचमधून ४७५ अशी एकूण १२५८ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. १४२० मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या या केंद्रातून राज्याला अधिक प्रमाणात वीजनिर्मिती दिल्याने बहुतांश भागात वीजभारनियमन टळले अाहे.

दीपनगर वीजकेंद्रातून उन्हाळ्यात उच्चांकी वीजनिर्मितीचे नियोजन केले आहे. उन्हाळ्यापूर्वीच केंद्राकडे विक्रमी काेळसासाठा आहे. जुन्या दोन्ही संचांतूनही स्थापित क्षमतेच्या तुलनेत समाधानकारक निर्मिती होत आहे. जुन्या संच दोनमुळे यावल, चोपडा तालुक्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत आहे. अभय हरणे, मुख्यअभियंता, दीपनगर औष्णिक केंद्र

राज्यातील १३ संच बंद
राज्यालाविजेची वाढती गरज असतानाच महानिर्मितीचे तब्बल १३ संच सध्या बंद आहेत. यात परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे संच पाण्याअभावी बंद आहेत तर कोरडीचे चार, चंद्रपूरचे तीन आणि खापरखेडा येथील एक असे तब्बल १३ संच बंद असल्याने हक्काच्या विजेवर पाणी फिरल्याने चिंता वाढली अाहे.

राज्यात वीजनिर्मिती अशी
औष्णिककेंद्र निर्मिती (मेगावॅट)
नाशिक- ५०२
खापरखेडा- ६९५
पारस- ४६५
चंद्रपूर- १,११३
भुसावळ- १,२५८