आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: पक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी मातीच्या हजार भांड्यांचे वाटप, पक्षिमित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भांड्यांना तार बांधण्याचे सुरू असलेले काम. - Divya Marathi
भांड्यांना तार बांधण्याचे सुरू असलेले काम.
धुळे​ - तीव्र उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणापाण्याची कमतरता भासू नये यासाठी शहरातील जगदीश पवार हे पक्षिमित्र एक हजार मातीच्या भांड्यांचे वाटप करणार अाहेत. स्वखर्चाने त्यांनी ही भांडी तयार करून घेतली अाहेत. शहरातील वेगवेगळ्या संस्था, शासकीय कार्यालये, बाग व्यावसायिकांना ही भांडी माेफत दिली जाणार अाहेत. त्यातून कडक उन्हाळ्यात पक्ष्यांना दिलासा मिळेल. 
 
शहरात पक्ष्यांना उन्हाच्या तीव्रतेत दाणापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सामान्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी शहरातील पक्षिमित्र जगदीश गोरख पवार यांनी पुढाकार घेतला आहे. व्यवसायाने लाकडांवर कोरीवकाम करणारे कारागीर असलेले जगदीश पवार यांनी पक्ष्यांच्या संगोपनासाठी एक हजार मातीची भांडी वितरित करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत शहरात ३०० भांड्यांचे वाटप केले आहे. त्यासाठी तीस हजार रुपयांचा खर्च त्यांनी केला आहे. कुंभाराकडून मातीची भांडी तयार करून ती झाडांवर अडकविता यावीत याकरिता स्वत:चा व्यवसाय बाजूला ठेवून ते परिश्रम घेत आहेत. कोणताच फायदा पाहता ज्या ठिकाणी पक्ष्यांचे अधिकाधिक वास्तव्य आहे, अशा ठिकाणी ही भांडी ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, प्रशासकीय संकुले, शाळा महाविद्यालयांनादेखील ही भांडी भेट देऊन पक्ष्यांच्या संगोपनासाठी अाग्रह धरणार आहेत. 
 
शहरात आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी ३०० भांडी अडकविली आहेत. स्वत:चा रोजचा व्यवसाय सांभाळून पक्षीप्रेमासाठी जगदीश पवार हे सध्या धडपड करीत असून, ही भांडी नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याबरोबरच पक्ष्यांसाठी नागरिकांनी दाणापाण्याची व्यवस्था करावी म्हणून जनजागृतीदेखील करीत आहेत. शहरातील ज्या नागरिकांना पक्ष्यांसाठी मातीची भांडी हवी आहेत, अशा नागरिकांनी वाडीभोकर रोडस्थित संताजी वूडक्राफ्ट या दुकानात जगदीश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
 
सामाजिक बांधिलकीतून उपक्रम 
- आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून हा संकल्प केला आहे. समाजातील प्रत्येक घटकात पक्षिप्रेम जागृत व्हावे तसेच प्रत्येकाने किमान उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी छतावर, बगिच्यात, अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी म्हणून हा उपक्रम राबवीत आहे.
-जगदीश पवार,पक्षिमित्र 
 
पुढील स्लाईडवर वाचा, पुढील वर्षी जिल्ह्यासाठी उपक्रम... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...