आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेची काेटीत फसवणूक करणारे गुलाबराव ‘फ्राॅडी’ मंत्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हामध्यवर्ती बँकेच्या चाेपडा शाखेत नाेटा बदलीच्या संशयावरून सीबीअाय चाैकशी सुरू असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर १५० काेटी रुपये बदलून घेतल्याचा बिनबुडाचा अाराेप केला अाहे. मंत्री असूनही बेजबाबदारपणे वक्तव्य करीत त्यांनी सीबीअायच्या चाैकशीत हस्तक्षेप केला अाहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सीबीअायकडेच का दिले नाहीत? 
 
गुलाबराव यांनी स्वत:च जिल्हा बँकेची एक काेटी रुपयांमध्ये फसवणूक केली अाहे. ते फ्रॉडी मंत्री अाहेत. फुकटच्या प्रसिद्धीसाठी माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. त्यांना न्यायालयात खेचून अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेतील सीबीअाय चाैकशीच्या अनुषंगाने बँकेच्या अध्यक्षा अॅड.राेहिणी खडसे, ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे यांच्या अादेशाने नाेटा बदली झाल्याचा अाराेप केला हाेता. यासंदर्भात माजी मंत्री खडसे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे स्वत: एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अाराेपी अाहेत.
 
 जेलमधून जामिनावर बाहेर येऊन मंत्री झाले अाहेत. त्यांनी स्वत: अाणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केळीसाठी खाेटी कागदपत्रे तयार करून बँकेकडून कर्ज घेतले, असा आरोप खडसेंनी केला. तसेच त्यांनी सातबाऱ्यावर कापूस,गारपिटीचे अनुदान देखील लाटले अाहे.
 
 शासनाची काेटी रुपयांत फसवणूक केली असून त्याचे सर्व पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा करत जिल्हा बँकेने केलेल्या चौकशी अहवालाची प्रत अामदार खडसे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. सहकार राज्यमंत्र्यांनी बँकेची प्रतिमा खराब केली असल्याने कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर बँकेच्या माध्यमातून कारवाई करू. जिल्हा बँकेतील संशय असलेल्या चाेपडा शाखेतील प्रकार हा नियमांचे, कायद्याचे उल्लंघन असू शकते, ते अपहार किंवा भ्रष्टाचार नाही हे मंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. 
 
सीबीअाय सारख्या वरिष्ठ संस्थेकडून चाैकशी सुरू असताना स्वस्त प्रसिद्धीचे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात अाहे. यासंदर्भात त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती अामदार खडसे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अामदार किशाेर पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित हाेते. 
 
शासनाने २१० काेटींचा निर्णय घ्यावा 
जिल्हा बँकेकडे २१० काेटी रुपयांच्या जुन्या नाेटा पडून अाहेत. अातापर्यंत या पैशावर बंॅकेला १० काेटी रुपयांचा फटका बसला अाहे. जिल्हा बँकेच्या चाेपडा शाखेतील नाेटा बदल झाल्याचा संशय असल्याने सीबीअाय चाैकशी करीत अाहे. चाेपड्यातील प्रकरणात नियमांचे उल्लंघन असू शकते, ताे अपहार नाही. बँकेची अार्थिक काेंडी हाेत असल्याने शासनाने बँकेकडील २१० काेटींचा निर्णय घ्यावा, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार अाहे.
 
 नाबार्ड अाणि अारबीअायने यापूर्वी चाैकशी केली अाहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना काेठे गैरव्यवहार झाल्याचा संशय येत असेल तर त्यांनी तेथे अावश्य चाैकशी करावी, अशी भूमिका बँकेचे उपाध्यक्ष अामदार किशाेर पाटील यांनी मांडली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...