आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सावधान! रस्त्यावर मठ्ठा-बर्फाचा गोळा घेण्याआधी हे नक्की वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावकरांनाे,अापण रस्त्यावर विकला जाणाऱ्या खुल्यावरील मठ्ठा पीत असाल तर सावधान. कारण या मठ्ठ्यामुळे अापणास जुलाब हाेणे, अावाज बसणे, खाेकला अादी घशाचे विविध अाजार बळावू शकतात, असा अहवाल उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस विभागाने दिला अाहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ‘दिव्य मराठी’ने नवीपेठ, स्वातंत्र चौक, नूतन मराठा महाविद्यालय परिसर अाणि कोर्ट चौकातून घेतलेेल्या नमुन्यांची उमविच्या प्रयाेगशाळेत तपासणी करण्यात अाली. यात 4 नमुन्यांपैकी केवळ एकच नमुना याेग्य ठरला असून 3 नमुन्यांमध्ये दूषित पाणी, अरारोटचे प्रमाण आढळले असून ते अाराेग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढण्यात अाला अाहे. 
 
शहराच्या तापमानाने चाळिशी अाेलांडल्याने शीतपेयांना माेठ्या प्रमाणात मागणी वाढली अाहे. हे लक्षात घेऊन चाैकाचाैकांत विक्रेत्यांनी मठ्ठ्यांची दुकाने थाटली अाहे. हा मठ्ठा 5 ते १० रुपयांत मिळत असल्याने अनेक नागरिक घशाची काेरड थांबवण्यासाठी चटकन या मठ्ठ्यांचे सेवन करतात. मात्र, हा मठ्ठा याेग्य पद्धतीने तयार करण्यात अाला अाहे, की नाही? हे कुणीच तपासत नाही. ‘दिव्य मराठी’ने जळगावकरांचे हित लक्षात घेऊन नमुने घेत ते प्रयाेगशाळेत तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील नवीपेठ, स्वातंत्र्य चौक, नूतन मराठा महाविद्यालय परिसर, कोर्ट चौकातून मठ्ठ्याचे नमुने घेतले. ते नमुने व्यवस्थित पॅक करून उमविच्या स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस विभागात तपासणीसाठी दिले. प्रयाेगशाळेत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या टीमने चारही नमुन्यांची तपासणी केली. यात एक नमुना याेग्य, तर तीन नमुने अयाेग्य असून ताे मठ्ठा पिल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सिद्ध झाले. उमविने करून दिलेल्या चाचणीच्या पद्धती निघालेल्या निष्कर्षांचा अहवाल ‘दिव्य मराठी’कडे साेपवला अाहे. त्यामुळे जळगावकरांनी खुल्यावरील मठ्ठा पिताना काळजी घेण्याची गरज या अहवालानंतर निर्माण झाली अाहे. 
 
-‘दिव्य मराठी’ने शहरातील वर्दळीच्या प्रमुख चार चाैकांमधून घेतले नमुने 
- चार पैकीएकच नमुना योग्य, तर उर्वरित तीन नमुन्यांमध्ये आढळले शरीराला घातक घटक 
- उमविच्यास्कूल ऑफ लाइफ सायन्सेस विभागाच्या प्रयाेगशाळेतून केली तपासणी 
 
तीन नुमन्यांमध्ये अशुद्ध पाणी आणि पिष्टमय पदार्थ 
- दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचणी करून मठ्ठ्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. तीन नमुन्यांमध्ये अशुद्ध पाणी, पिष्टमय पदार्थांचा वापर झाल्याचे आढळून आले आहे. हे शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरील मठ्ठा पिणे टाळावे.
डॉ.भूषण चौधरी, विभागप्रमुख, मायक्रोबायोलॉजी, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, उमवि 
 
येथून घेतले तपासणीसाठी नमुने
-नवीपेठ, - स्वातंत्र चौक -कोर्ट चौक
-नूतन मराठा महाविद्यालय परिसर 
 
अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष 
शहरात चौका-चौकांत मोठ्या प्रमाणात उघड्यावर स्वस्तात मठ्ठा विक्री होत आहे. या विक्रेत्यांकडे अन्न प्रशासन विभाग कानाडोळा करीत असल्यामुळे दिवसेंदिवस विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. विक्रेत मठ्ठा तयार करताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता बिनधास्तपणे अशुद्ध पाणी दूषित बर्फ वापरतात. या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे. 
 
...असे हाेतात अाराेग्यावर परिणाम 
दूषित पाणी, अरारोट वापरून तयार केलेल्या मठ्ठ्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. यात घसा खवखवणे, खोकला, आवाज बसणे, घशात जळजळ हाेणे अशा व्याधी होतात. तसेच जुलाब होण्याची शक्यता असते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अशी केली चाचणी; चार नुमन्यांसाेबत विद्यापीठात शुद्ध पाणी, दही वापरून तयार केलेल्या मठ्ठ्याचा नमुनासुद्धा तपासला...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...