Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Divya Marathi Special

जळगावच्या विद्यार्थ्याने तयार केली व्यावसायिक वेबसाइट, महिलांसाठी उपयुक्त

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 08:36 AM IST

  • भाग्येशने तयार केलेल्या वेबसाइटचे पेज.
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यास सुरू असतानाच रायसोनी बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने उद्योग-व्यवसायासाठी उपयोगात येणाऱ्या दोन वेबसाइटची निर्मिती केली. यामध्ये एक ऑनलाइन शॉपिंगसाठी असून, दुसरे ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारे संकेतस्थळ आहे.
भाग्येश लक्ष्मीकांत त्रिपाठी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या तो बीसीएच्या (बॅचलर अाॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांना वेबसाइटच्या निर्मितीसंदर्भात प्राथमिक ज्ञान दिले जाते आहे. तसेच वेबसाइट कशी डिझाईन करावी हे देखील सांगितले जाते. भाग्येशने एक पाऊल पुढे टाकत स्वत: दोन वेबसाइट निर्माण केल्या. दोन्ही वेबसाइट दोन उद्योग-व्यवसायांसाठी वापरल्या जात आहेत. मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’पासून प्रेरणा घेऊन आपण हे संशोधन करीत असून, या संशोधनात प्रा.गौरव जैन यांचे मार्गदर्शन मिळाले आहे, असे भाग्येशने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
ऑनलाइन शॉपिंग
महिलांसाठी एक ऑनलाइन शॉपिंगसाठी ही वेबसाइट आहे. खेडी रोड परिसरात राहणाऱ्या हेमा लोहिया यांच्यासाठी ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. लोहिया या बुटिक उत्पादनांची विक्री करतात. महिलांना या वेबसाइटवरून त्यांच्या उत्पादनांची माहिती, क्वाॅलिटी पाहता येऊ शकते. तसेच उत्पादनाची निवड झाल्यानंतर ई-मेल, फोन नंबरच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा वेबसाइटवर देण्यात आली आहे. घरबसल्या ऑनलाइन शॉपिंगसाठी या वेबसाइटचा वापर केला जातो आहे. महिन्याकाठी सुमारे ३० ग्राहक वेबसाइटच्या माध्यमातून जोडले गेले असल्याची माहिती भाग्येशने दिली.
पुढील स्लाईडवर वाचा, कशासाठी तयार केली वेबसाईट...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended