आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमात नसलेल्या वाहनांची चेकपाेस्टवर असते प्रतीक्षा, ट्रकचालकांना दमदाटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशच्या सीमेवर चेकपाेस्टसह चालणाऱ्या विविध गाेरखधंद्यांबाबत माहिती घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी अाणि १० फेब्रुवारी राेजी दाेन दिवस रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर, रावेरसह मध्य प्रदेशातील दाेन्ही चेकपाेस्टवर स्टिंग केले. अाेव्हरलाेड, अाेव्हर हाइट असलेल्या वाहनासाेबतच अाणि सर्व बाबींची पूर्तता केलेल्या ट्रकमधून चालकाच्या बाजूला बसून प्रवास केला. मुक्ताईनगर, रावेरकडून मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या अाणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या अशा दाेन्ही बाजूने ट्रक, कंटेनरमध्ये महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशच्या दाेन्ही नाक्यांवर अनुभव घेतला. यातून या चेकपोस्टवर नियमात नसलेल्या वाहनांची चातकाप्रमाणे प्रतीक्षा असते. तसेच वाहने सोडवण्यासाठी सर्रासपणे मांडवली केली जात असल्याचे दिसून आले. 

मध्यप्रदेशच्या सीमेवर दमदाटीचा प्रयत्न : केवळइशारे अाणि पैशांवरच काम चालत असलेल्या चाेरवड जवळील मध्य प्रदेशच्या सीमेवरील चेकपाेस्टवर चार ते पाच जण हाेते. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींवर संशय अाल्याने त्यातील दाेघांनी विचारणा केली. येथे का थांबले, चाैकशी का करतात, तुमच्या गाड्या काेणत्या अाहेत? यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करीत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पैसे घेतले जात असलेल्या खाेलीकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चाैघे जण बाहेर अाले. फाइलमधील कागद राहिल्याचे कारण सांगत प्रतिनिधींनी वाद टाळत काढता पाय घेतला. 
 
सारेच मालामाल : चेकपाेस्टवर निरीक्षक, शिपाई, चालक, पंटरपर्यंत सारेच मालामाल असतात. दिवसभरात पैसे जमा करणारे खासगी पंटर ५०० रुपये अाणि ते हजार रुपये वरकमाई करतात. एका पंटरकडून मिळालेल्या महितीनुसार उपप्रादेशिक कार्यालयास एक ते दीड लाख तर प्रादेशिक कार्यालयाला एक लाख याप्रमाणे वाटा दिला जातो. महिन्याकाठी येथे अडीच काेटींची उलाढाल होते. यात राजकीय व्यक्तींची देखील मर्जी सांभाळावी लागत असल्याची माहिती मिळाली. 
 
ड्यूटीबदलासाठी स्पर्धा : चेकपाेस्टवरड्यूटी लावून घेण्यासाठी गेल्या वर्षापर्यंत लाखाे रुपयांची बाेली लावली जात हाेती. परंतु इलेक्ट्राॅनिक्स काटे अाॅनलाइन यंत्रणेद्वारे थेट मुंबईला जाेडल्याने निरीक्षकांच्या अानंदावर विरजन पडले अाहे. अाॅनलाइननंतर देखील सहा महिन्यांत पर्यायी व्यवस्थेचा शाेध लागल्याने चेकपाेस्टरच्या ड्यूटीसाठी पुन्हा ‘खुशाली’ सुरू झाली अाहे. ड्यूटी लावून घेण्यासाठी निरीक्षक महिन्याकाठी सर्व मिळून ते १० लाख रुपयांची खुशाली देतात. यात अाठ तासांच्या ड्यूटीमध्ये दाेन्ही बाजूने निरीक्षकांची नियुक्ती असते. निरीक्षक स्वत:हून सलग दाेन किंवा तीन शिफ्ट देखील काम करण्यास उत्सुक असतात. धुळे कार्यालयातून ड्यूटी लावली जाते. यासाठी धुळे कार्यालयाला लाख रुपये अाणि जळगाव कार्यालयाला दीड लाख रुपये द्यावे लागतात. 
 
अनुभव क्र.२ रावेर चेकपाेस्ट : 
१० हजारांची धमकी ५०० रुपयांत मांडवली 

मध्यप्रदेशातून अनंतपूरकडे एका कंपनीची मशिनरी घेऊन जाणारी गाडी (क्र. एचअार ७४ ७८४६) १० फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजता बऱ्हाणपूरकडून रावेरच्या दिशेने मध्य प्रदेशच्या चेकपाेस्टवर पाेहचली. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी या वाहनात चालकाजवळ बसून प्रवास केला. मध्य प्रदेशच्या नाक्याजवळ रस्त्यावर गाडी थांबल्यानंतर ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी चालकासाेबत शेजारच्या खाेलीत गेला. तेथे चालकाने १०० रुपयांच्या दाेन नाेटांसह खिडकीतून फाइल अात दिली. त्या वेळी अात असलेल्या कर्मचाऱ्याने अाधी बाहेरच्या चाैकीदाराकडे बघितले. त्याने इशारा केल्याने अात बसलेल्या कर्मचाऱ्यांने फाइल घेण्यास नकार दिला. गाडी अाेव्हरहाइट असल्याचा चाैकीदाराचा सांकेतिक भाषेतील निराेप त्याच्यापर्यंत पाेहचला हाेता. बाहेर बसलेल्या चाैकीदाराने अाेव्हरहाइटचा इशारा दिल्याने अातून अाणखी २०० रुपयांची मागणी अाली. चालकाने पुन्हा १०० रुपये हातात टेकवत तेथून मार्ग काढला. तेथून रावेरच्या दिशेने दीड किलाेमीटरवर असलेल्या चाेरवड येथील महाराष्ट्राच्या चेकपाेस्टवर गाडी अाली. ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी चालकासह फाइल घेऊन पुन्हा अात गेला. अाधीच्या नाक्याप्रमाणेच येथेही अाधीच माहिती अात पाेहाेचली हाेती. त्यामुळे अाेव्हरहाइट असल्याचे सांगत अातून १० हजार ५०० रुपयांचे चलन फाडावे लागेल, असा दम देत त्याने बाहेर काढून दिले. त्याचवेळी एका पंटरने येऊन दाेन हजारात साेडून देण्याचे अाश्वासन दिले. साेबतचा चालक अनुभवी असल्याने ताे अर्धा तास तेथेच थांबून राहिला. दाेन हजार रुपये देण्यास त्याने असमर्थता दर्शवली. मालकाशी संपर्क हाेत नसल्याचे कारण त्याने सांगितले. याचवेळी रात्रीपासून रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेल्या तीन अाेव्हरलाेड कंटेनरवाले लाेक बाेलणीसाठी अात अाले. या परिस्थितीत गर्दीतून मार्ग काढत चालकाने ५०० रुपयांची नाेट काढून देत फाइल ताब्यात घेतली. या वेळी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने पंटरला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. साेबत असलेल्या ट्रकचालकाने ‘तुम मरवाअाेंगे यार, बडा साहब देखेगा ताे दाे हजार रुपये देणे पडेंगे,’ असे म्हणत हात धरून बाहेर खेचले अाणि ट्रकमध्ये बसून ताे रावेरकडे मार्गस्थ झाला. 
 
‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी : आमच्या दोन ट्रक आहेत. त्या ओव्हरलोड आहेत. मध्य प्रदेशात जायचे आहे, काय करता येईल? 

चेकपोस्ट वरील कर्मचारी : (सुरुवातीला शंका घेत) कोण आहात तुम्ही? ट्रक कुठे आहेत? 
प्रतिनिधी: आम्ही भुसावळला राहतो. आमचे ट्रक रावेरजवळ उभे केले आहेत. 
कर्मचारी : नंबर सांगा? 
प्रतिनिधी: चालकाचा फोन लागत नाहीये. ट्रक ओव्हरलोड आहे. जाता येईल का? 
कर्मचारी : आधी गाडीचे नंबर सांगा, काय माल आहे त्यात? 
प्रतिनिधी: जिनिंग प्रेसिंगच्या मशीन आहेत. बुऱ्हाणपूरला पोहोचवायच्या आहेत. किती पैसे लागतील? शासकीय दंडापेक्षा काही पैसे तुम्हीच ठेऊन घ्या ना. 
कर्मचारी : ठिक आहे. मी आधी ट्रक पाहतो. 
प्रतिनिधी: किती पैसे लागतील? 
कर्मचारी : एका ट्रकचे हजार रुपये लागतील. आता येथे अधिकारी आहेत. ते गेल्यावर तुम्हाला फोन करतो. त्यानंतर १५ मिनिटात गाड्या घेऊन या. 
 
चोरवड येथील महाराष्ट्र राज्याच्या चेकपोस्टवर बेकायदेशीर वाहने कशी सोडली जातात, याची सखोल माहिती घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी आपण ट्रकचालक मालक असल्याचे भासवून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी ‘डिल’ केले. हा सर्व संवाद मोबाइलच्या व्हिडिओ कॅमेरात कैदही केला आहे. झालेला संवाद असा... 
 
अनुभव क्रमांक : बेकायदा वाहने सोडण्यासाठी ‘डिल’ सोडवण्यासाठी सर्रासपणे मांडवली केली जात असल्याचे दिसून आले

मध्य प्रदेशच्या सीमेवर दमदाटीचा प्रयत्न 
केवळ इशारे अाणि पैशांवरच काम चालत असलेल्या चाेरवड जवळील मध्य प्रदेशच्या सीमेवरील चेकपाेस्टवर चार ते पाच जण हाेते. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींवर संशय अाल्याने त्यातील दाेघांनी विचारणा केली. येथे का थांबले, चाैकशी का करतात, तुमच्या गाड्या काेणत्या अाहेत? यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करीत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पैसे घेतले जात असलेल्या खाेलीकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चाैघे जण बाहेर अाले. फाइलमधील कागद राहिल्याचे कारण सांगत प्रतिनिधींनी वाद टाळत काढता पाय घेतला. 

* सारेच मालामाल....... 
चेकपाेस्टवर निरीक्षक, शिपाई, चालक, पंटरपर्यंत सारेच मालामाल असतात. दिवसभरात पैसे जमा करणारे खासगी पंटर ५०० रुपये अाणि ते हजार रुपये वरकमाई करतात. एका पंटरकडून मिळालेल्या महितीनुसार उपप्रादेशिक कार्यालयास एक ते दीड लाख तर प्रादेशिक कार्यालयाला एक लाख याप्रमाणे वाटा दिला जातो. महिन्याकाठी येथे अडीच काेटींची उलाढाल होते. यात विविध क्षेत्रातील घटकांचा वाटा ठरलेला असतो. अधून-मधून राजकीय व्यक्तींची देखील मर्जी सांभाळावी लागत असल्याची माहिती मिळाली. 

ड्यूटी बदलासाठी स्पर्धा........ 
चेकपाेस्टवर ड्यूटी लावून घेण्यासाठी गेल्या वर्षापर्यंत लाखाे रुपयांची बाेली लावली जात हाेती. परंतु इलेक्ट्राॅनिक्स काटे अाॅनलाइन यंत्रणेद्वारे थेट मुंबईला जाेडल्याने निरीक्षकांच्या अानंदावर विरजन पडले अाहे. अाॅनलाइननंतर देखील सहा महिन्यांत पर्यायी व्यवस्थेचा शाेध लागल्याने चेकपाेस्टरच्या ड्यूटीसाठी पुन्हा ‘खुशाली’ सुरू झाली अाहे. ड्यूटी लावून घेण्यासाठी निरीक्षक महिन्याकाठी सर्व मिळून ते १० लाख रुपयांची खुशाली देतात. यात अाठ तासांच्या ड्यूटीमध्ये दाेन्ही बाजूने निरीक्षकांची नियुक्ती असते. तीन शिफ्टमध्ये वेगवेगळे निरीक्षक काम करतात. निरीक्षक स्वत:हून सलग दाेन किंवा तीन शिफ्ट देखील काम करण्यास उत्सुक असतात. धुळे कार्यालयातून ड्यूटी लावली जाते. यासाठी धुळे कार्यालयाला लाख रुपये अाणि जळगाव कार्यालयाला दीड लाख रुपये द्यावे लागतात. 

वजनकाटा नाही; अंदाजे दंड 
चोरवडयेथील महाराष्ट्र राज्याच्या हद्दीच्या चेकपोस्टवर अधिकृत वजनकाटा नाही. त्यामुळे वाहनांच्या टायरची संख्या उंची पाहून अंदाजे ओव्हरलोडचा अंदाज घेतला जातो. डिजिटल इंडियाचा गाजावाजा करणाऱ्या शासनाने चेकपोस्ट सारख्या ठिकाणी मोठी डोळेझाक केल्याचे दिसून येते.चोरवडपासून काही अंतरावर तोलकाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत हा कारभार रामभरोसेच आहे. 

चेकपोस्टवर आलेले अवजड वाहन 
स्टिंग अाॅपरेशनदरम्यान मुक्ताईनगर चेकपाेस्टवर असलेल्या नागालँडची पासिंग असलेल्या एका ट्रकमधील चालकाने बसू देण्यास नकार दिला. पण त्याला विश्वासात घेऊन बाेलते केले. त्या वेळी त्याने महाराष्ट्रात येण्याची भीती वाटते. काेणीही गाडीमध्ये शिरून फसवणूक करण्याची शक्यता असल्याची भीती त्याने वर्तवली. पठाणी वसुल्यांमध्ये ट्रकचालक महाराष्ट्रात येण्यास घाबरतात. चेकपाेस्टवर जाे-ताे लुबाडण्याचाच प्रयत्न करताे. २०० रुपये दिले तरच लवकर सुटका हाेते. याबाबत केरळ सर्वाधिक सुरळीत असल्याचे तो म्हणाला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...