आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: ट्रॅव्हल्सचे तुटलेले पत्रे, फाटक्या सीटवर बसून धोकादायक प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅव्हलचे तुटलेले पत्रे आणि बाकाखालीच ठेवलेले अतिरिक्त टायर. - Divya Marathi
ट्रॅव्हलचे तुटलेले पत्रे आणि बाकाखालीच ठेवलेले अतिरिक्त टायर.
जळगाव - शहरातून दररोज पारोळा, अमळनेर, धरणगाव, जामनेरकडे धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची अवस्था अत्यंत खराब झाली अाहे. यातून हजारो प्रवाशांना तुटलेले पत्रेे, सीटवर बसवून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. ‘दिव्य मराठी’तर्फे मंगळवारी शहरातील नेरीनाका परिसरात उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. यात अनेक अनधिकृत बाबी आढळून आल्या आहेत. 
 
खासगी ट्रॅव्हल्समधून पुण्याहून जळगावला येत असताना पत्रा निखळून पडल्यामुळे अरुणा मराठे गजानन मराठे या बहीण, भावाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे यंत्रणेकडून या वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, लांब पल्ल्यांसह जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची अवस्थादेखील अत्यंत खराब असल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. मुदत संपलेल्या वाहनांचा सर्रास वापर होत असून यात प्रवासी वाहतूक केली जाते आहे. तास-दोन तासांचा हा प्रवास कोणत्या दिवशी जीवावर बेतू शकतो, याचा अंदाज प्रवाशांना येत नाही. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत बसचालक राजरोसपणे नियमबाह्य प्रवासी वाहतूक करीत आहेत. 
जळगावातून बेदमुथा, श्रीकृष्ण, जुबेर, माता बिजासनी, श्री दुर्गा आदी खासगी ट्रॅव्हल्स जामनेर, अमळनेर, पारोळा, धरणगाव, नेरी, चोपडा या मार्गावर धावत आहेत. दिवसभरातून हजारो प्रवासी यातून प्रवास करीत आहेत. मात्र, या ट्रॅव्हल्सची अवस्था अतिशय खराब झाली आहे. यात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. तरी देखील प्रादेशिक परिवहन विभागाची यावर अद्याप नजर पडलेली नाही. या विभागाने नियमित तपासणी करून अयोग्य ट्रॅव्हल्सचे परवाने रद्द केल्यास भविष्यात
असल्या प्रकारचे अपघात टाळता येऊ शकतात. 
 
असे आढळून आले दोष 
- अनेक ठिकाणीगाड्यांचे पत्रेे तुटलेली अाहेत. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वेल्डिंग करून जोडले
आहे. 
- सीटचे कुशन निघाले आहे. त्यामुळे लोखंडी रॉड बाहेर आलेले दिसून येतात. याच टोकदार रॉडजवळ बसून, उभे राहून प्रवासी प्रवास करतात. 
- चालकाच्या सीटला लागूनच प्रवासी बसतात. काही ट्रॅव्हल्सचा गियर दांडा तारेने बांधलेला आहे. 
- क्लिनर धावत्या बसच्या दरवाजात उभा राहून प्रवाशांना आवाज देतो. जास्त प्रवासी मिळावे म्हणून दरवाजात देखील प्रवासी उभे केले जातात. ओव्हर सीट, ओव्हर लोडचा नियम पाळत नाही. 
- काही ट्रॅव्हल्सची बॉडी जीर्ण झाली आहे. खिळखिळ्या झालेल्या ट्रॅव्हल्समधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. 
- ट्रॅव्हल्सलादरवाजेचनाहीत, ज्यांना आहेत ते बंद करण्यासाठी चक्क तारांचा वापर केला जात अाहे. 
- अतिरिक्त टायरथेट चालकाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर किंवा प्रवाशांच्या सीटजवळ ठेवलेले आहे. त्यामुळे बसण्यासाठी अडचण निर्माण होते. 
- सुरक्षेसंदर्भात कोणतीच काळजी घेतलेली नाही. ट्रॅव्हल्समध्ये फायर एक्स्टिंग्युशर, प्रथमोपचार पेटी आढळून आली नाही. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ‘त्या’ बसला योग्यताच नाही... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...