आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख, समृद्धी अन् चैतन्याच्या प्रार्थनेने घराघरांत लक्ष्मीपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चैतन्याचे प्रकाशपर्व असणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपूजन रविवारी घराघरांत करण्यात अाले. अाश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनाची वेळ पहाटे ४.३० ते वाजेदरम्यान ब्रह्ममुहूर्तावर हाेता तर सकाळी वाजेपासून ते १२.३५ वाजेपर्यंत, दुपारी २.०५ वाजेपासून ३.३५पर्यंत तर संध्याकाळी ५.३१ ते ९.३५ पूजेचे मुहूर्त हाेते. लक्ष्मी स्थिर राहाे, सुख, समृद्धी घरात येवाे, अशी प्रार्थना करीत लक्ष्मीपूजन करण्यात अाले. पहाटे पणती लावून अभ्यंगस्नानाने दिवाळीच्या दिवसाची सुरुवात झाली.
शहरातील गाेलाणी मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये गाेरज मुहूर्ताएेवजी सकाळी पूजन करण्यात आले. फटाक्यांची लड फाेडून पूजेचा मुहूर्त अनेकांनी साधला. लक्ष्मीच्या प्रतिमेसह शिवाचा खजिनदार अाणि धनसंपत्तीचा स्वामी म्हटला जाणारा कुबेराचेही पूजन करण्यात अाले. यासह गणपती वरुण कलश पूजन करून महालक्ष्मीची स्थापना करण्यात अाली. यामध्ये साेन्याचे, चांदीचे नाणे अन् रकमेची पूजा करण्यात अाली. त्याचप्रमाणे लेखणी अाणि वही पूजन करीत सरस्वती पूजन करण्यात अाले. या वेळी पाच प्रकारची फळे, समृद्धीचे प्रतीक मानले जाणाऱ्या साळीच्या लाह्या, बत्तासे, अावळा, धणे, गूळ, मूग, ऊस यासह मिठाई ठेवत नैवेद्य अर्पण केला गेला. या वेळी केरसुणी पूजनाला अधिक महत्त्वाचे स्थान असून या दिवशी वाईट गाेष्टींना घरातून बाहेर काढत लक्ष्मीचे स्वागत केले जाते. त्यामुळे केरसुणीचे खरे महत्त्व या दिवसाला असून खासकरून पूजा करण्यात अाली.

घरांची अाकर्षक सजावट...
या निमित्ताने फुलांची अाकर्षक सजावट घराघरात करण्यात अाली हाेती. प्रत्येक घरासमोर रांगोळ्यांचे गालिचे पसरले हाेते. या वेळी महिला वर्गातर्फे भल्या माेठ्या अाकर्षक अशा रांगाेळ्या काढण्यात अाल्या. लक्ष्मीचे स्वागत सडा, रांगाेळी काढून, घराला फुलांचे ताेरणे लावून करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...