आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅपी करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही - बीव्हीजीचे चेअरमन गायकवाड यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सरकारने शेतकऱ्यांना ज्ञान देऊन समर्थ करून त्यांचे हात मजबूत केल्यास कर्ज मागण्याची त्यांच्यावर वेळ येणार नसल्याची अपेक्षा भारत विकास ग्रुपचे चेअरमन हणमंत गायकवाड यांनी व्यक्त केली अनेकांत मी एकटा आहे. कॉपी करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. सर्व काही कष्टाने मिळवले, अशा साध्यासोप्या त्यांनी आपल्या यशाचे गुपित उघड केले. गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद त्यावेळी ते बोलत होते. हाऊसकिपिंगचे काम करणारे गायकवाड शेतीकडे कसे वळले, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल गायकवाड बोलत होते. इस्त्राईलचे लोक भेटले. त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीविषयी जाणले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते अनेकपट उत्पन्न मिळवतात. त्यांच्यामुळे शेती करण्याची प्रेरणा मिळाली. हर्बल अॅग्रोकडे वळलो. उत्पन्न दुप्पट करणाऱ्या हर्बल औषधींचे उत्पादन सुरू केले. कृषीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. हर्बल औषधींच्या अातापर्यंत २०० प्रयोग केले आहेत. पुणे येथे जनावरांचे डीएनए करणारी देशातील पहिली प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डीएनएनंतर दुभत्या जनावरांचे दूध देण्याची क्षमता वाढवता येते. 

यासाठीही औषधी तयार करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांमध्ये शेतीसंदर्भात अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली नसल्याची खंत व्यक्त करून शेतकऱ्यांनीही स्मार्ट झाले पाहिजे. ज्या पिकाला गेल्या वर्षी भाव मिळाला, त्या पिकाची दुसऱ्या वर्षी पेरणी करू नये. वेगवेगळे प्रयोग करावेत. तरच शेती फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले. फूडपार्क, ऊर्जा, शेती, १०८ रुग्णवाहिका सेवेबरोबर असंघटित कामगारांसाठी पीएफच्या सुविधेठीही प्रयत्नशील आहे. आता १० कोटी लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न आहे, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...