आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस, प्रसूती शस्त्रक्रियेनंतर शरीरातच डॉक्टर विसरले बँडेजचा तुकडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नाॅर्मलप्रसूतीनंतरच्या शस्त्रक्रियेत शरीरात चार इंचांचा काॅटन बँडेजचा तुकडा तसाच ठेवून टाके घातल्याचा प्रकार सिव्हिलमध्ये एप्रिलला घडला. तीन दिवसांनंतर संबंधित महिलेचे पाेट दुखू लागल्याने ती पुन्हा सिव्हिलमध्ये गेली असता, डाॅक्टरांनी ड्रेसिंग करून तिला घरी पाठवले. मात्र, तरीही त्रास सुरूच असल्याने अखेर या महिलेला साेमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. तेथे साेनाेग्राफीत शरीरात बंॅडेजचा तुकडा अाढळून अाल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करून ताे तुकडा काढल्याने या महिलेचा जीव वाचला. या घटनेमुळे सिव्हिलच्या डाॅक्टरांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.

कांचननगरातील पायल विशाल तुंडलायत (वय २३) हिचे दोन वर्षांपूर्वी बुलडाणा येथील युवकाशी लग्न झाले आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी म्हणजे जळगावात आली होती. तिने एप्रिल रोजी दुपारी वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीला जन्म दिला. तिची प्रसूती नॉर्मल झाली. मात्र, प्रसूतीनंतरच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी वापरलेला कॉटन बँडेजचा चार इंचांचा तुकडा तिच्या शरीरात तसाच राहू दिला. एवढेच नव्हे, तर हलगर्जीपणाचा कळस म्हणून डॉक्टरांनी त्यावर टाकेदेखील घातले. तसेच एप्रिल रोजी पायलला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. मात्र, एप्रिल रोजी पायलच्या पोटात दुखू लागल्याने तिला असह्य वेदना झाल्या. तसेच तिच्या शरीराला प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे तिने पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. मात्र, तेव्हाही डॉक्टरांनी केवळ ड्रेसिंग करून तिला घरी पाठवले; परंतु वेदना असह्य झाल्यामुळे अखेर सोमवारी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोनोग्राफीत तिच्या शरीरात कॉटन बंॅडेज असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुपारी वाजता शस्त्रक्रिया करून बंॅडेजचा ताे तुकडा शरीरातून बाहेर काढण्यात आला.

रुग्णांची नेहमी हेळसांड
सामान्यरुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीदेखील करण्यात अाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यात बालमृत्यू मातामृत्यूच्या तक्रारी अधिक आहेत. त्यातच पायलसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सिव्हिलमधील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे हे जिवंत उदाहरण आहे. अशा घटनांमध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते.

मृत्यूच्या दाढेतून आली परत
पायलच्याशरीरात आठ दिवस कॉटनचा तुकडा राहिला. परिणामी, तिच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले. त्यामुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून कॉटनचा तुकडा बाहेर काढण्यात आला. हा तुकडा आणखी एक-दोन दिवस राहिला असता, तर पायलच्या जीवावर बेतले असते. दरम्यान, सिव्हिलमध्ये प्रसूतीनंतर घालण्यात आलेले टाकेदेखील उघडले गेले होते. तरीदेखील तेथील डाॅक्टरांना बंॅडेज िदसले नाही याबाबत अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

हलगर्जीपणाबाबत तक्रार करणार
मुलीला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कॉटन बँडेजचा तुकडा तिच्या शरीरात राहिल्याने तिला असह्य वेदना झाल्या. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार अाहे. मनोज चरण दाभाडे, पायलचेवडील

दाेषींवरकठाेर कारवाई करणार
संबंधितमहिलाप्रसूतीनंतर पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात अाले. तथापि, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. डॉ. किरण पाटील, प्रभारीजिल्हा शल्यचिकित्सक

...तरपीडितेच्या जीवावर बेतले असते
अशाप्रकारे शरीराच्या कोणत्याही भागात वैद्यकीय साहित्य राहिल्यास त्याचे इन्फेक्शन होते. संबंधित महिलेच्या शरीरात आठ दिवस कॉटन बंॅडेज राहिले. आणखी एक-दोन दिवस अशी परिस्थिती राहिली असती, तर कदाचित महिलेच्या जीवावर बेतले असते. डॉ. वैशाली जैन, पायलवरशस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर

मायलेकीची भेट नाही
पायलच्याप्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या मुलीची प्रकृती खालावली हाेती. त्यामुळे त्याच दिवशी तिच्या नवजात मुलीला एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मुलगी आठ दिवसांची होऊनही अातापर्यंत या मायलेकीची भेट होऊ शकलेली नाही.
पायल विशाल तुंडलायत