आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजन समितीत भाजपची सरशी, डीपीडीसीत भाजप 5, राष्ट्रवादी 3, तर शिवसेनेचा एका जागेवर विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी) नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतदेखील भाजपच्याच सदस्यांची सरशी झाली आहे. यात नऊ पैकी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. 
 
जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. ग्रामीण मतदारसंघाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते.त्यात राष्ट्रवादीचे भूषण पाटील यांना २९, शिवसेनेचे गोपाल चौधरी यांना २७, तर राष्ट्रवादीचेच हिंमत पाटील यांना १३ मते मिळाली. भूषण पाटील आणि शिवसेनेचे गोपाल चौधरी यांना विजयी घोषित करण्यात आले. या मतदारसंघात ६४ पैकी मते बाद ठरवण्यात आली. लहान नागरी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला गटाच्या तीनजागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यात भुसावळच्या भाजपच्या उमेदवार सोनल रमाकांत महाजन यांना ७९, राष्ट्रवादीच्या वर्षा राजेंद्र शिंदे यांना ७६, तर भाजपत नव्यानेच प्रवेश घेतलेल्या पुष्पलता साहेबराव पाटील यांना ६५ मते मिळाल्याने या तीन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. नागरिकांचा मागास महिला प्रवर्गातून एका जागेसाठी तीन उमेदवारांत लढत झाली. यात भाजपच्या उमेदवार जयश्री नरेंद्र पाटील या दुसऱ्या फेरीत १३८ मते मिळवून विजयी झाल्या. सर्वसाधारण प्रवर्गातून रिंगणात असलेले भाजपचे सुनील रमेश काळे राजेंद्र रामदास चौधरी यांचा मतांचा कोटा पूर्ण झाल्याने दोन्ही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. 
 
वानखेडे सर्वाधिक मतांनी विजयी : लहान नागरी मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गातून एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात प्रवीण चौधरी यांना ३५, भाजपचे राजेंद्र चौधरी यांना ६९ तर राष्ट्रवादीचे सावद्याचे उमेदवार माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना १९० मते मिळाली. वानखेडे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. 

राष्ट्रवादीची दोन मते पुन्हा फुटली : जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मते फुटल्यामुळे सत्ता मिळविण्याचे प्रयत्न फसलेल्या राष्ट्रवादीची दाेन मते जिल्हा नियाेजन समितीच्या निवडणुकीतदेखील फुटली. राष्ट्रवादीच्या दोन मतदारांनी राष्ट्रवादीसह सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने ही मते फुटल्याची चर्चा होती. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, कुंदन हिरे, भाऊसाहेब थोरात, बंडू कापसे, नायब तहसीलदार एल. एन. सातपुते, सुनील समदाणे यांनी सहकार्य केले. 
 
ओळखपत्र मागवून केले मतदान : चोपड्याच्या नगराध्यक्षा मनिषा चौधरी या सर्व नगरसेवकांसह गुरूवारी दुपारी ३.१५ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या मतदान केंद्रावर गेलेल्या होत्या. त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र होते. ते मतदान केंद्रावर ग्राह्य धरण्यात आले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र आणण्यास चोपड्याला पाठवण्यात आले. मतदान केंद्रावर त्यांना टोकन देण्यात आले होते. ओळखपत्र आणल्यानंतर नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी वाजता मतदान केल्याचे गटनेते जीवन चौधरी यांनी सांगितले.
 
विजयी उमेदवार 
ग्रामीणक्षेत्र- गाेपाल चाैधरी (शिवसेना), भूषण पाटील (राष्ट्रवादी) 
लहान नागरी गट- राजेश वानखेडे (राष्ट्रवादी) 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - जयश्री नरेंद्र पाटील (भाजप) 
सर्वसाधारण महिला प्रवर्ग- पुष्पलता पाटील (भाजप), साेनल महाजन (भाजप), वर्षा शिंदे (राष्ट्रवादी) 
सर्वसाधारण प्रवर्ग- सुनील काळे (भाजप), राजेंद्र चाैधरी (भाजप) 
बातम्या आणखी आहेत...