आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव-‘गरज उठे गगन सारा..., जब गुंजे जय भीम का नारा...!’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रथ समतेचा  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजीनगर परिसरातून काढण्यात आलेला ‘रथ समतेचा’ लक्षवेधी ठरला. - Divya Marathi
रथ समतेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजीनगर परिसरातून काढण्यात आलेला ‘रथ समतेचा’ लक्षवेधी ठरला.
जळगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजीनगर परिसरातून काढण्यात आलेला ‘रथ समतेचा’ लक्षवेधी ठरला. या रथावर भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, संत कबीर, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. तर या समता रथाचे सारथ्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दर्शवण्यात आले होते. सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून हा रथ साकारला.
 
१२६ किलोचा केक कापून बाबासाहेबांचे स्मरण 
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती सामाजिक संस्था शाळेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. माैलाना अाझाद फाउंडेशनतर्फे पक्ष्यांना पाणी वाटप करण्यात आले. तर भीमराज ग्रुपतर्फे रेल्वे स्टेशनजवळ १२६ किलाेचा केक कापण्यात अाला. 
 
डाॅ. आंबेडकर पीडित, मागासलेल्यांचा आवाज, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ.चेल्लादुराईंचे प्रतिपादन 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पीडित आणि मागासलेल्या वर्गाचा बुलंद आवाज होते. ते स्वतः उच्चविद्या विभूषित होते शिक्षण क्रांतीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. उत्तम नागरिक असलेल्या बाबासाहेबांचे घटना निर्मितीचे कार्य बहुमूल्य असल्याचे प्रतिपादन गांधी रिसर्च फाउंडेशनचे डीन डॉ.जॉन चेल्लादुराई यांनी केले. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती जैन हिल्स येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने साजरी करण्यात आली. गांधीतीर्थ परिसरात सकाळी सामूहिक प्रार्थना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी आपले विचार व्यक्त केले. कोणत्याही महापुरुषांचे कार्य लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांचे विचार आचरणात आणून चांगला समाज घडवण्यासाठी कृतिशील झाले पाहिजे. त्याबरोबरच इतिहासाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, असे गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन यांनी सांगितले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकारी कोमल शिंदे यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील प्रमुख घटनांविषयी माहिती दिली. विद्यार्थी दशेतील जीवनाबद्दल बोलतांना शीतल जैन म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत विद्यापीठांतून शिक्षण घेतले होते. आपल्या प्रगल्भतेच्या बळावर समाजातील अज्ञानावर त्यांनी प्रभावीपणे प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न केला. सविता महाकाळ, संतोष भिंताडे, चंद्रशेखर पाटील, नरेंद्र चौधरी, सीमा तडवी यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. 
 
 
मूजे महाविद्यालयातील सभेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन 
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त मू. जे. महाविद्यालयात अभिवादन सभा झाली. यात राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राजीव पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. डी. जोशी हे होते. प्रा. संजय हिंगोणेकर गोपाल बागुल यांनी कविता सादर केल्या. या वेळी डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. कल्पना नंदनवार, डॉ. जगदीश बोरसे, प्रा. अनिल क्षीरसागर, डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. मनोज महाजन, प्रा. दिलवरसिंग वसावे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. योगेश महाले यांनी सूत्रसंचालन केले. जयंतीच्या पूर्वसंधेला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
 
या वेळी डॉ. जुगलकिशोर दुबे यांनी ‘महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. अनिल क्षीरसागर, वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 
 
गणेश क्रीडा अन् सांस्कृतिक संस्थेतर्फे मिरवणुकांचे स्वागत 
गणेश क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थेतर्फे बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात अाला. यात सकाळी मिरवणुकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. सुरवातीला शिवाजी पुतळा शिवाजीनगर येथे माल्यार्पण करुन मिरवणूक काढण्यात अाली तर समाराेप बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात अाला. तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात अाले. यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात अालेल्या मिरवणुकांमधील नागरिकांना पाणी अल्पोपहार वाटप करण्यात अाले. यामध्ये क्विंटल पाेहे वाटप केले. तसेच मिरवणुकांचे स्वागतही करण्यात अाले. अध्यक्ष नवनाथ दारकुंडे, अतुल हराळ, अशाेक कदम, एकनाथ दारकुंडे, श्रीकांत साेले, गाेतीक गाेसावी, पंकज खाेले, गणेश माळी, दीपक जगताप यांनी सहकार्य केले. 
 
अदनान संस्थेतर्फे कार्यक्रम 
अदनान संस्थेतर्फे अक्सानगर मेहरूण येथे कार्यक्रम झाला. एपीअाय समाधान पाटील यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात अाले. या वेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा परिचय दिला. सत्तार अली, नगरसेवक इक्बालाेद्दीन पिरजादे यांनी माहिती दिली. अक्सानगर, मेहरूण परिसरात नागरिकांना पेढे वाटून अानंद साजरा केला. अध्यक्ष असद खान, हाफीज खान पठाण, प्रशांत नाईक, प्रवीण साेनार उपस्थित हाेते. 

आसोदा येथे भीम क्वीझ कॉन्टेस्ट स्पर्धा 
आसोदा येथील आंबेडकर नगरात भीम क्वीझ कॉन्टेस्ट स्पर्धा घेण्यात आली. यात अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जि.प.सदस्या पल्लवी पाटील पं.स.सदस्या ज्योती महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तुषार महाजन, रवी देशमुख यांनी पुतळ्यास माल्यार्पण केले. सरपंच नबाबाई बिऱ्हाडे अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सुनील पाटील, जयंत कोल्हे, मंडळ अधिकारी सुभाष तायडे, तलाठी आर. आर. झाल्टे, संजीव बिऱ्हाडे, केशव बिऱ्हाडे, प्रदीप बिऱ्हाडे उपस्थित होते. भूषण भारंबे, नितीन ढाके, गिरीश भोळे, भूषण चौधरी, सूरज पाटील, धवल पाटील यांनी सहकार्य केले. 
 
डाॅ.आंबेडकरांच्या भेटीची गावे निधीपासून वंचित 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त शासनाने १७० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत डॉ. आंबेडकरांनी भेटी दिलेल्या राज्यातील १२५ गावे ५७ ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची घोषणा केली होती. मात्र, संबंधित गावे स्थळांच्या विकासासाठी निधीच वितरित झाल्याने शासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडल्याची स्थिती आहे. 

सन २०१५-२०१६ हे वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष असल्याने हे समता, सामाजिक, न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक भारत घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि संघर्षाची समाजाला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शासनाने डॉ.आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा असलेली १२५ गावे निवडून त्या गावांचा, वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवले आहे. यासाठी २४ मार्च २०१७ राेजी शासन निर्णय काढून १७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासाचा अध्यादेश १२ ऑगस्ट २६ ऑक्टोबर २०१६ रोजी काढला आहे. 
 
जिल्ह्यातील कंडारीचा समावेश 
यानिर्णयान्वये २६ ऑक्टोबरला काढलेल्या आदेशात राज्यातील २९ गावांचा यात समावेश आहे. यासह २४ मार्चच्या निर्णयात २९ गावांचा समावेश केला. यात महाड, अलिबाग, रायगड, तळेगाव येथील बाबासाहेबांचे घर यासह त्यांनी भेटी दिलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातून भुसावळ तालुक्यातील कंडारी या गावाचा समावेश करण्यात आला. या गावांच्या विकासासाठी सुमारे कोटीपर्यंतचा निधी दिला जाणार आहे. 
 
आसोदा गाव समावेशाच्या प्रतीक्षेत 
स्वातंत्र्यापूर्वी१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वस्तीस भेट देऊन धनजी बिऱ्हाडे कुटुंबीयांकडे दोन दिवस मुक्काम केला होता. या संबंधीचे पुरावे ऐतिहासिक दाखले अनेकदा दिले गेले. यासह स्मारकासह दलित वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी या गावाचा समावेश या १२५ गावांमध्ये करावा, यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रस्ताव सादर केला असून त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. शासनाने पुढील टप्प्यात आसोदा गावाचा समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे. 
 
अभिनव विद्यालय 
अभिनव विद्यालयात मुख्याध्यापक हेमंत पाटील यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपशिक्षक सजन तडवी यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. या वेळी उपशिक्षक प्रेमसिंग चव्हाण, साधना कोल्हे, वैशाली पाटील, नयना मोरे, दीप्ती नारखेडे, वैशाली मोरे, कोमल पाटील, कांता मोरे, ज्याेतीबाला जाधव, हर्षदा काळे, सोनाली शिंपी, संजीवनी पाटील, विष्णू ठाकरे, पंकज पाटील, वैशाली सोनवणे, तनुजा वाणी, देविदास चौधरी उपस्थित होते. 
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटातर्फे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जे. डी. भालेराव यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. या वेळी दतू तायडे, रतन अडकमोल, रफिक शहा, आर. के. सपकाळे, शब्बीर शहा, मिलिंद हिरोळे, रवी इंगोले, सायराबी शहा, शरद धनगर, सुनील कुंभार, रोहित सपकाळे, भीमराव सपकाळे, भैया सपकाळे, मुकेश बाबू, हितेंद्र सपकाळे, अजय सोनवणे, जावेद खाटीक उपस्थित हाेते. 
 
भंगाळे माध्यमिक विद्यालय 
सि.ग. भंगाळे माध्यमिक जे. एस. शिंदे प्राथमिक विद्यालयात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. विष्णू भंगाळे अध्यक्षस्थानी हाेते. मुख्याध्यापक नरेंद्र बाेरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, विवेक नेहेते, दीपक भारंबे, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, निखिल नेहेते, सारिका सरोदे, अश्विनी वाघ, दीपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे, अनिता चित्ते उपस्थित होते. 
 
न्यू इंग्लिश स्कूल 
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक योगेश चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. 
 
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्ष कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात अाले. या वेळी रवींद्र पाटील, विजया पाटील, वाय.एस.महाजन, कल्पना पाटील, मीनल पाटील, कल्पिता पाटील, रोहन सोनवणे, अॅड. सचिन पाटील, अॅड. राजेश गोयर, संजय चव्हाण, सलीम इनामदार, जयप्रकाश महाडीक, सतीश चव्हाण उपस्थित होते. 
 
नाभिक महामंडळ 
नाभिक महामंडळातर्फे संत गाडगेबाबा उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. या वेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी, चंद्रकांत सोनवणे, मुकूंद सपकाळे, शिवाजीराव शिंपी, मुकुंद मेटकर, दिलीप सपकाळे, दत्तू तायडे, पृथ्वीराज साेनवणे, सखाराम मोरे, मनीष कुंवर, अनिल सूर्यवंशी, सुनंदा सुर्वे, छाया काेरडे, महारू इशे,अशोक सूर्यवंशी,अनिल सूर्यवंशी,किशोर वाघ उपस्थित होते. 
 
वीर सावरकर रिक्षा युनियन 
वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. या वेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, भानुदास गायकवाड, पोपट ढोबळे, शशिकांत जाधव, सुभाष पाटील, उत्तम पाटील, नरेंद्र महाजन, नाना कोळी, कैलास विसपुते, किरण मराठे, संभाजी पाटील, राजू पाटील, प्रकाश पाटील, संजय ठाकूर, जगदीश भाट, रंजीत नाईक, संतोष पवार,उत्तम काळे, समाधान लोखंडे, अशोक पाटील, विलास ठाकूर उपस्थित होते. 
 
व.वा.जिल्हावाचनालय 
व.वा.वाचनालयात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रभात चौधरी, अॅड.गुरुदत्त व्यवहारे, शरदचंद्र छापेकर, संगीता अट्रावलकर, प्रा. मनीष जोशी, संजय बनसोड, अनिल अत्रे, मोहन सोनार, ज्ञानदेव वाणी उपस्थित होते. 
 
नरहरी सोनार युवा फाउंडेशन 
संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन ग्रुप साप्ताहिक स्वर्णकाळतर्फे डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक श्यामकांत दाभाडे, अमोल दाभाडे, संजय भामरे, तुषार सोनार, लोटन भामरे, महेश सोनार आदी उपस्थित होते. 
 
भीमराज ग्रुपतर्फे अनोख्या पद्धतीने वंदन 
बाबासाहेबांच्या जयंती १२६ व्या जयंतीनिमित्त भीमराज ग्रुपतर्फे रेल्वे स्टेशनजवळ १२६ किलाेचा केक कापण्यात अाला. लहान मुलांच्या हस्ते केक कापून या वेळी उपस्थितांना वाटण्यात अाला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्धांच्या सामूहिक वंदनेने करण्यात अाली. यामध्ये माेठ्या प्रमाणात स्त्री लहान मुली सहभागी झाल्या हाेत्या. या वेळी बबलू सावळे, अजय बागुल, विजय गायकवाड, मंगल वाघ, जुबेर खाटीक, जावेद शेख, भाेला बिहारी, प्रफुल्ल गायकवाड, जीवन पगारे, ललित जाधव उपस्थित हाेते. 
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी आणि 25 फोटोज पाहा कशी झाली भीम जयंती.... 
बातम्या आणखी आहेत...