आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावाच्या दगडफेकीमुळे धुराच्या नळकांड्यांचा वापर, दीपक काेळी यांची चाैकशी अायाेगासमाेर साक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील मच्छीबाजार परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी विराेधी गटाकडील लाेकांकडून ताेंडे बांधून दगड विटांचा माेठ्या प्रमाणावर मारा केला जात हाेता. परिणामी त्यापासून बचाव करण्यासाठी अाणि त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या पाेलिसांना फाेडाव्या लागल्याची माहिती त्यावेळचे अाझादनगरचे पाेलिस निरीक्षक असलेले दीपक काेळी यांनी चाैकशी अायाेगासमाेर दिली.

धुळे शहरातील मच्छीबाजार, चर्नीरोड परिसरात दि. जानेवारी २०१३ रोजी दोन गटांमध्ये दंगल झाली होती. याप्रकरणी दंगलीची चौकशी होण्यासाठी दंगल चौकशी आयोग स्थापन करण्यात आला असून, या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल हे काम पाहत आहेत. या चौकशी आयोगाचे काम शहरालगत असलेल्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात होत आहे. शुक्रवारी या चौकशीच्या कामकाजात पोलिस निरीक्षक दीपक कोळी यांची साक्ष उलटतपासणी घेण्यात आली. दीपक कोळी यांनी उलटतपासणीत सांगितले, की दंगल भागात इमारतीवरून दगडफेक केली होती. तसेच दगडफेकीत काही वस्तू फेकणाऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी घोषणाबाजी केली जात होती. पोलिसांना अडथळे निर्माण करण्यासाठी एका गटाकडून लोटगाड्या आडव्या करण्यात आल्या. उलटतपासणीत नकाशे दाखवून त्या- त्या गटाची वस्ती, संमिश्र वस्ती आदींबाबत प्रश्न विचारण्यात आले. २००८च्या दंगलीनंतर पुरेसा पोलिस बंदोबस्त कर्मचारी दिल्याने दंगल होऊ शकली, अशा प्रश्नावर हे खरे नाही, असे कोळी म्हणाले.

याप्रकरणी उद्या शनिवारीही कामकाज हाेणार अाहे. त्यात कोळी यांची उलटतपासणी सुरू राहील. त्यांची साक्ष पूर्ण झाल्यास मोहाडीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची साक्ष सुरू होईल. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक कोल्हापूरचे विद्यमान पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हे तयारीसाठी येथे मुक्काम करून आहेत.
बातम्या आणखी आहेत...