आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नियुक्तिपत्रे घोटाळा 50 लाखांचा, महिलेमुळे घोटाळा उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नावाने जिल्ह्यातील ४६ जणांना बनावट नियुक्तिपत्रे दिल्याची धक्कादायक बाब समाेर अाल्यानंतर हा घोटाळा ५० लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या काही पीडितांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात येऊन व्यथा मांडली. आपल्या जावई, नातूसाठी पीडितांनी आपले घर, शेती गहाण ठेवून लाखो रुपये दिले.
 
मात्र, अडीच -तीन वर्षे वाट पाहूनही नोकरी लागली नाही. तसेच जि.प.कर्मचाऱ्याने पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या एका महिलेमुळे हा घोटाळा उघडकीस आला. नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणारे दोन कर्मचारी जिल्हा परिषदेशी संबंधित आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी शहर पोलिस जिल्हा पेठ पोलिसांनी हद्दीच्या वादावरून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा अाराेपही पीडितांनी केला. 
 
जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वर्ग च्या ४६ पदांची बनावट नियुक्तिपत्रे तयार करून प्रत्येकाकडून सुमारे लाख ते लाख ३० हजार रुपयांपर्यंतची रक्कम तीन वर्षांपूर्वीच उकळली अाहे. मात्र, तीन वर्षे उलटूनही नाेकरी मिळत नाही. त्यामुळे यादीत नावे असलेल्या उमेदवारांनी नेमणुकीसाठी तगादा लावला. त्यानंतर एका उमेदवाराच्या पाचाेरा तालुक्यातील दहिगाव संत येथील सासूने अात्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर हा सर्व सावळा गोंधळ समाेर अाला अाहे. 
 
दाेघांनी मिळून केली फसवणूक 
दहिगाव संत येथील राजू भाेजू भाेई हा एरंडाेल पंचायत समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी अाहे. तसेच दहिगाव संत ग्रामपंचायतमध्येही पाणीपुरवठा विभागात काम करताे. तसेच जळगाव पंचायत समितीमधील हातपंप यांत्रिकी विभागात सुभाष भिकन मिस्तरी (सूर्यवंशी) कर्मचारी अाहे. या दाेघांनी मिळून फसवल्याचा अाराेप पीडितांसाेबत अालेल्या दहिगाव संत येथील अॅड. प्रतिभा पाटील यांनी केला. 
 
राजू भाेई हा पंचायत समितीचा कर्मचारी असल्याने गावातील सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्यानेही विश्वासघात केल्याचा अाराेप पीडितांनी केला. सुभाष मिस्तरी हा गेल्या महिनाभरापासून कार्यालयात भेटत नव्हता. ताे कार्यालयातच येत नव्हता. त्यामुळे गटविकास अधिकारी साेनवणे यांनी मिस्तरी याला हजर राहण्याचे पत्र दिल्याची माहिती अॅड. पाटील यांनी दिली. 
 
केस नं. 1 घरगहाण ठेवून दिले पैसे 
राजूभाेई याला तीन वर्षांपूर्वी घर गहाण ठेवून लाख रुपये दिले हाेते. मात्र, त्यांनाही नाेकरी मिळाली नाही. भाेई याने साेनवणे यांना डिसेंबर २०१६ राेजी ८४ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला. ताे सुद्धा वटला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आले, असे नाना पर्वत साेनवणे यांनी सांगितले. 
 
चौकशीनंतर गुन्हा दाखल करता येईल 
- जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील बनावट नियुक्तिपत्र प्रकरणी जि. प. अधिकाऱ्यांनी शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. त्या प्रमाणे चौकशीचे आदेश देऊन चाैकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करता येईल. सचिनसांगळे, उपविभागीय पाेलिस अधिकारी, जळगाव 
 
केस नं. 2 कर्ज घेऊन दिले पैसे 
म्हसावद(ता. जळगाव) येथील मनाेज रमेश काेळी यांनी राजू भाेई याला ९० हजार रुपये दिले हाेते. मात्र, त्यांनाही नियुक्तिपत्रच मिळालेे. नेमणूक मिळाल्याने त्यांनी भाेईकडे तगादा लावला. त्याने मनोज यांना ९० हजारांचा चेक दिला. मात्र, ताेही वटला नाही. 
 
केस नं. 3 चेकदाेन वेळा झाला बाउन्स 
दहिगाव संत (ता. पाचाेरा) येथील रवींद्र सुकदेव काेळी यांनी वर्षांपूर्वी राजू भाेई याला लाख रुपये दिले हाेते. नोकरी लागत नसल्याने काेळी यांनी भाेईकडे पैशांचा तगादा लावला. त्यानंतर भाेई याने लाख रुपयांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धनादेश दिला. मात्र, दाेन वेळा बँकेत टाकूनही ताे वटला नाही. 
 
केस नं. 4 जावयासाठी भरले 1 लाख ३० हजार 
हाेळकलाणे (ता. धरणगाव) येथील राहुल सुरेश पाटील यांच्यासाठी त्यांच्या दहिगाव संत (ता. पाचाेरा) येथील सासू सुनंदा पाटील यांनी गावातील राजू भाेजू भाेई या पं. स.च्या कर्मचाऱ्याला दाेन वर्षांपूर्वी शेत गहाण ठेवून लाख ३० हजार रुपये दिले. मात्र, दाेन वर्षे उलटूनही नाेकरी मिळत नसल्याने भाेईकडे पैशांसाठी तगादा लावला. पाटील यांनी अात्महत्येची धमकी दिल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस अाला. 
बातम्या आणखी आहेत...