आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: धूलिवंदनाची धूम; इको फ्रेंडली रंगांची उधळण; रेन डान्सची धूम अन‌् डोलचीचे फटके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याचे फवारे अंगावर झेलत डीजेच्या तालावर नृत्य करताना तरुण. - Divya Marathi
पाण्याचे फवारे अंगावर झेलत डीजेच्या तालावर नृत्य करताना तरुण.
धुळे - इकोफ्रेंडली रंगांची उधळण करत पाण्याच्या माऱ्यात मनसोक्त भिजत शहरात धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्यात आले. शहरात पाचकंदील परिसरासह ठिकठिकाणी यंदा शावरची व्यवस्था करण्यात आली हाेती. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर पारंपरिक गीतांवर तरुण नृत्य करण्यात दंग झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महिलांनीही नाचण्याचा आनंद घेतला. 
 
शहरात रविवारी (दि.१२) सायंकाळी पारंपरिक पद्धतीने चौकाचौकात होळीचे पूजन करण्यात येऊन दहन करण्यात आले. काही ठिकाणी कचऱ्याची होळी करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शहरातील विविध भागात रविवारी सकाळपासूनच अनेकांनी एकमेकांना रंग लावण्यासह होळी धूलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यास प्राधान्य दिले होते. आग्रा रोडसह विविध भागात दुपारपासून अनेकांचे चेहरे रंगले होते. त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच शहरातील गल्ली क्रमांक पाच, सहासह पाचकंदील, खंडेराव बाजार, जमनालाल बजाज रोड चौक, रेल्वेस्थानक रोड, देवपूर परिसरात धूलिवंदनाचा सर्वाधिक उत्साह दिसून आला. चौका-चौकांमध्ये पाचशे ते हजार लिटरचे पाण्याचे ड्रम भरून ठेवण्यात आले होते. त्यात रंगीत पाणी भरण्यात आले होते. काही मंडळांनी शावरची व्यवस्था केली होती. या ठिकाणी डीजेच्या दणदणाटात तरुणांनी नृत्य करण्यास प्राधान्य दिले होते. काही ठिकाणी पाण्याचे टँकरही मागवण्यात आले होते. दुपारी उशिरापर्यंत अनेक जण धूलिवंदन खेळण्यास मग्न असल्याचे दिसून आले. शहरातील विविध भागात दुपारी तीन वाजेनंतर शुकशुकाट झाल्याचे दिसून आले.
 
धूलिवंदनाला अनेकांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याचबरोबर अनेकांनी रंगीबेरंगी विग परिधान केले होते. याशिवाय गोल्डन चेन, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हॅट घालून तरुणांनी धूलिवंदनाचा आनंद लुटला. तसेच रामालय ग्रुपतर्फे राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत धूलिवंदन साजरे झाले. सर्वच पक्षनेते मतभेद विसरून एकत्र आले हेाते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, डोलचीचे आकर्षण... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...