आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एकवीरा' यात्रा निर्विघ्नसाठी पोलिस यंत्रणेत कमालीची दक्षता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- खान्देशकुलस्वामिनी एकवीरादेवीच्या यात्रेला शुक्रवार (दि.२२)पासून प्रारंभ होत आहे. यात्राेत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये, यासाठी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी ही माहिती दिली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक साहेबराव पाटील, उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव, देवपूर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक देविदास भाेज, मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी मंगळवारी सायंकाळी बंदाेबस्ताचा अाढावा घेतला. त्याचबरोबर परिसराची पाहणी केली. यात्रेत माेठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक महिला युवतींची छेडखानी करतात. त्याचबरोबर व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केली जाते. हे प्रकार घडू नये यासाठी मंदिराच्या परिसरात मंदिर ट्रस्टचे ३२ तर नदीपात्रासह परिसरात पाेलिस प्रशासनाचे दहा असे एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, दाेन कंट्राेल रूम असतील. एक कंट्रोल रूम मंदिरातील ट्रस्टच्या कार्यालयात तर दुसरा देवपूर पाेलिस ठाण्याच्या आवारात असेल. दाेन्ही कंट्राेल रूममध्ये समन्वय राहावा यासाठी पाेलिस प्रशासनाने वायरलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात्रेच्या मध्यवर्ती भागात वीस फूट उंच मचाण उभारण्यात येऊन यात्राेत्सवावर नजर ठेवली जाणार आहे. यात्राेत्सवाच्या काळात दाेन पाेलिस निरीक्षक २४ तास नियुक्त असतील. त्याचबरोबर दोनशे पोलिस कर्मचारी नियुक्त असतील. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचे पथक असेल. याशिवाय साध्या वेशातील कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात असतील. मुली, महिलांची छेड काढणे, पाकीट, बॅग चाेरी करणाऱ्यांविरुद्ध पाेलिसांकडून कठाेर कारवाई केली जाणार आहे. यात्रेच्या काळात मंदिराच्या परिसरात दंगा नियंत्रण पथक तैनात असेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.

वाहतूक राहणार सुरळीत
मंदिराकडेयेणारा मुख्य रस्ता माेकळा राहावा यासाठी रस्त्याच्या अातील बाजूस दुकाने लावण्यास परवानगी देण्यात आली अाहे. त्याचबराेबर नदीपात्रात पाळणे उभारले जातील. त्यामुळे देवपूर पाेलिस ठाण्यासमोरील रस्ता वाहतुकीसाठी माेकळा असेल. वाहनांसाठी मंदिरासमाेरील उद्यानात पार्किंग व्यवस्था करण्यात आली अाहे. तसेच मंदिराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेट‌्स‌ लावले जाणार अाहेत.
वस्तू जाळण्यास प्रतिबंध
यात्रेच्याकाळात मंदिराचे सभागृह अाणि परिसरात वस्तू, नारळाच्या करवंटी जाळण्यास प्रतिबंध करण्यात अाला अाहे. अागीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संशयास्पद वस्तू, व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्या तर पोलिस अथवा ट्रस्टच्या कार्यालयात माहिती द्यावी. बॉम्बशोधक पथकातर्फे मंदिराच्या परिसराची राेज तपासणी करण्यात येणार अाहे.

अाज जाऊळ, अारतीचा कार्यक्रम
मंदिरात उद्या बुधवारी कुळधर्म, कुळाचार आदी कार्यक्रम होतील. त्याचबरोबर लहान मुलांचे जाऊळ काढतील. त्यादृष्टीने मंदिरासमाेरील बाजूस अाणि नदीपात्रात जाऊळ काढण्यासाठी स्वतंत्र मंडप टाकून व्यवस्था करण्यात अाली अाहे. दरम्यान, मंदिर ट्रस्टकडून संपूर्ण मदिरावर अाकर्षक विद्युत राेषणाई करण्यात अाली अाहे. ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.