आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षातील गद्दारांचे थाेबाड अाधी रंगवा, माजी मंत्री खडसेंचे कार्यकर्त्यांना अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘पक्ष संघटन करताना विराेधकांशी लढण्याची मुळीच गरज नाही, पक्षातच गद्दार आहेत. त्यामुळे अाधी त्यांचे थाेबाड रंगवून कार्यकर्त्यांनी घाबरता त्यांच्या ताेंडावर थुंकावे. गद्दारांना साेबत घेऊन निवडणुका लढल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे पक्षाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. पक्षात राहून काहींनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी संपणारा नव्हे तर संपवणारा अाहे,’ अशा कडक शब्दात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पक्षांतर्गत विराेधकांचा समाचार घेतला. यावेळी संतप्त खडसे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वकिली करणाऱ्या संघटन मंत्र्याचे भाषण राेखले. तसेच खडसेंच्या राजीनाम्यानंतर पेढे वाटणाऱ्या शिवसेनेच्या निषेधाचा ठरावही एकमताने करण्यात आला.
जळगाव भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठक बुधवारी अायाेजित करण्यात अाली हाेती. खडसे यांच्या राजीनाम्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनीच यावेळी भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. खडसेंशिवाय दुसरा काेणत्याही विषयावर एेकून घेण्याची तयारी नसलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे संघटनमंत्री रवी भुसारी यांचेही भाषण बंद पाडले. ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांची वकिली करू नका’, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले. संतापलेल्या कार्यकर्त्यांना शांत करताना खडसे यांनी तब्बल तासभर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘पक्षात राहून अारडा-अाेरड करणाऱ्यांचा पक्षाने अाधी बंदाेबस्त केला पाहिजे. अनेकांना मी उकिरड्यावरून उचलून पदे दिली, तेच लाेक अाज माझ्याविराेधात कारवाया करीत अाहेत. ‘सात, शिवाजीनगर’शी (सुरेश जैन ) माझा वैयक्तिक वाद नाही. परंतु, पक्ष वाढवण्यासाठी मी अायुष्यात तिकडे पायरी चढलाे नाही. ठरवले असते तर इतरांप्रमाणे मी ही राजकीय सेटिंग करू शकलाे असताे, पण कार्यकर्तेे डाेळ्यांपुढे असल्याने तसे केले नाही. अनेकांना अंगावर घेतले, शेपूट घातले नाही. मी घडवलेल्या लाेकांनीच असे कृत्य केले. त्यांना थाेडीही लाज वाटली नाही, याचे दु:ख वाटते,’ अशी खंत खडसेंनी बाेलून दाखवली.

राेख गिरीश महाजनांकडे
खडसेंच्यासमर्थनार्थ जिल्हाभरातून अालेले कार्यकर्ते घाेषणाबाजी देत असतांना व्यासपीठाजवळ महिलांच्या रांगेमागे बसलेले जामनेरातील कार्यकर्ते मात्र शांततेत बसले हाेते. बैठकीचा एकूणच राेष जलसंपदामंत्री गिरीष महाजनांच्या दिशेने हाेता. खडसेंनी देखील भाषणात महाजनांना चिमटे काढले. खडसे नेहमीच बैठकांना उपस्थित राहतात, तर महाजन मात्र बैठकांमध्ये खडसेंसमाेर येण्यास टाळत असल्याचा प्रत्यय बुधवारीही अाला.

खडसेंची शेराेशायरी
अजीबदास्ताँ है ये, कहा शुरू कहा खतम; ये मंजिले है काैनसी, ना तुम समझ सके ना हम. (या वाक्याने केली भाषणाची सुरुवात, भाषण काेठून सुरू करावे अन् काेठे संपवावे याचा ४० वर्षांत पहिल्यांदा पेच पडल्याचे सांगत खडसेंनी गाण्याचे बाेल म्हटले.)
ना खंजीर से डरता हूँ, ना तलवार से, याेद्धा हू लढते अाया हू, जिंदगीभर ख्वाॅईश रहे की, दुश्मन मिले ताे काेई खानदानी मिले, मगर मेरी बदनसिबी यही रही की दुश्मन भी मिले ताे गैर खानदानी निकले, इसीका दुख है, (प्रीती मेनन- शर्मा, अंजली दमानिया, मनीष भंगाळे या विराेधकांचा उल्लेख करताना खडसेंकडून या अाेळींचा उल्लेख).
बातम्या आणखी आहेत...