आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमध्ये राबणारे करोडपती नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी कोट्यधीश उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना या उमेदवारांनी दिलेले घोषणापत्र आणि शपथपत्रातून त्यांची सांपत्तीक स्थिती समोर आली असून त्यात काही शेतकरी आहेत.
नगराध्यक्षपदाच्या लढतीमधील भाजपचे रमण भोळे आणि जनाधारचे सचिन चौधरी व्यवसायाने शेती करत असल्याचा उल्लेख शपथपत्रात आहे. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता कोटींची, तर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश नेमाडेंचा व्यवसाय व्यापार असून त्यांची मालमत्ता लाखोंची असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक लोकनियुक्त पद्धतीने होणार असल्याने या निवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरूप आले आहे. या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत १० उमेदवार रिंगणात अाहेत. यातील तीन उमेदवार लखपती आणि कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे, भाजप आणि जनाधारच्या उमेदवारांचा प्रमुख व्यवसाय शेती असून त्यांच्या नावे कोट्यवधींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

शपथपत्र आणि मालमत्ता विवरणात दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार रमण भोळे यांनी १९८८मध्ये बंगलोर विद्यापीठातून बी. ई. चे शिक्षण घेतले. जनाधारचे उमेदवार सचिन संतोष चौधरी यांनी मानव भारती विद्यापीठातून २०१३ मध्ये बी. टेक. सिव्हिलची पदवी घेतली आहे. या दोन्ही उच्चशिक्षित उमेदवारांनी व्यवसाय मात्र शेती निवडला आहे. शेती व्यवसाय करून त्यांच्या नावे कोट्यवधींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश नेमाडे यांनी २०१० मुक्त विद्यापीठातून बी.ए केले असून शपथपत्रात आपला व्यवसाय व्यापार दाखवला आहे.

शेतीतून लाखोंचे उत्पन्न
सचिन चौधरी यांनी शेती व्यवसायातून या आर्थिक वर्षात आयकर रिटर्नमध्ये १९ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न दर्शवले आहे.भाजपचे उमेदवार रमण भोळे यांनी आयकर रिटर्नमध्ये १४ लाख १५ हजार १३९, तर पत्नीच्या नावे लाख ८१ हजार ३७७ रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश नेमाडे यांनी यंदाच्या वर्षात लाख २३ हजार ९७१ रुपयांचे उत्पन्न दर्शवले असून त्यांच्या पत्नीच्या नावे २०१०/११ मध्ये लाख २० हजार ३३६ रुपयांचे उत्पन्न दर्शवले.

Áनिर्मल कोठारी(भाजप) : प्रभागक्रमांक १९ चे उमेदवार कोठारी यांनी एलआयसी पोस्टात ३० लाख रुपयांची बचत केली आहे.
Áपुरुषोत्तम नेमाडे(भाजप) : प्रभागसहा ‘ब’चे उमेदवार नेमाडे यांनी कोटी २४ लाखांची पोस्टाचे अल्पबचत एलआयसीत गुंतवणूक केली आहे.

Áरमण भोळे(भाजप) : भोळेयांच्या नावे कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये बाजारमूल्य असलेली कृषी जमीन, तर कोटी ५१ लाख २० हजार रुपये बाजारमूल्य असलेली अकृषक जमीन आहे. निवासी इमारतींचे मूल्य कोटी ४० लाख १६ हजार रुपये तसेच व्यापारी इमारतींचे २३ लाख ५० हजार रुपयांचे मूल्य आहे. त्यांच्या नावे एकूण १६ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आणि पत्नीच्या नावे ४६ लाख ५० हजार रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे.

Áसचिन चौधरी(जनाधार आघाडी) : माजीआमदार संतोष चौधरींचे चिरंजीव सचिन चौधरींच्या नावे काहुरखेडा, चोरवड, वरखेडी, शहानूरवाडी आदी ठिकाणी कृषी जमीन आहे. तिचे बाजारमूल्य ११ लाख १८ हजार रुपये, तर निवासी इमारत ११ हजार ४०० रुपये, व्यापारी इमारत ३५ लाख २३ हजार ६५ रुपये आहे. इतर सांपत्तीक हक्कात लाख रुपयांचा हिस्सा धरून त्यांच्या नावे ६८ लाख १२ हजार ९९४ रुपये मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे स्थावर किंवा जंगम मालमत्ता नाही.

Áउमेश नेमाडे(राष्ट्रवादी काँग्रेस) : नेमाडेंच्यानावे तीन लाख रुपये बाजारमूल्य असलेली कृषी जमीन मौजे भानखेडे शिवारात आहे. तर भुसावळ, वाघोदा (ता.रावेर) येथे अकृषिक जमिनी आहेत. यात भुसावळच्या जमिनीची २० हजार ४४० तर वाघोद्याच्या जमिनीचे मूल्य लाख ९५ हजार २८१ रुपये आहे. लाख रुपये किमतीची निवासी इमारत तर लाखांची व्यापारी इमारत आहे. त्यांच्याकडे २१ लाख १५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.
बातम्या आणखी आहेत...