आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचाराच्या फलकांमुळे तणाव झाल्यास उमेदवार जबाबदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - अारपीडीराेडवर प्रचाराचे फलक अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोरे यांनी ३० उमेदवारांना नोटीस बजावली आहे. प्रचाराचे बॅनर्स, फलक आणि पोस्टरची काळजी उमेदवारांनी घ्यावी. फलकांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित उमेदवारांना जबाबदार धरले जाईल, अशा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
अारपीडी राेडवर माेठ्या प्रमाणावर पालिका निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचाराचे फलक लावले अाहेत. रविवारी अज्ञातांनी यातील काही फलक फाडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलिसांनी रविवारी या भागात गस्त सुरू केली हाेती. राजकीय फलक फाडल्याने तणाव निर्माण हाेताच पाेलिसांनी संबंधित फलकधारक उमेदवारांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यामुळे वातावरण निवळले हाेते. राजकीय वाद निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलिस प्रशासनाने उमेदवारांना नोटीस दिली आहे. शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच उमेदवारांना फलकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना पोलिसांनी दिली उपनिरीक्षक नेमानी, सहायक फाैजदार फारुक शेख, कमलाकर बागुल, विजय पाटील, प्रमाेद पाटील यांनी रविवारी आणि साेमवारी संबंधित उमेदवारांना नाेटिसा बजावल्या आहेत.
मार्गदर्शकसूचना :संबंधित उमेदवारांनी पाेस्टर, बॅनर्स, झेंडे उंचावर लावावे, फलकांचे रक्षण करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची आहे. त्यामुळे पाेस्टर खाली पडणार नाही. तसेच त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
पालिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साेमवारी सकाळी १० वाजता शासकीय गोदामात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली. शहरातील १९१ मतदान केंद्रांसाठी २३९ ईव्हीएम सील करण्याची प्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. श्रीकुमार चिंचकर, सहायक अधिकारी तथा तहसीलदार मीनाक्षी राठाेड, मुक्ताईनगरचे तहसीलदार जितेंद्र कुवर, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथील सर्वच नायब तहसीलदार, प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयातील १५० पेक्षा अधिक कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मशीनची बॅटरी, त्यातील डाटा या बाबींची तपासणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी २३९ ईव्हीएम वापरले जाणार असून त्यात ४८ राखीव ईव्हीएमचा समावेश आहे. मशीन सील करण्यासाठी २० टेबलांवर प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...