आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात अाजी-माजी अामदार निवडणूक अायाेगाच्या निगराणीत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. गुरुवारी हाेणाऱ्या मतदानप्रसंगी कुठेही कायदा-सुव्यवस्थेला गालबाेट लागू नये, याची दक्षता घेतली जात अाहे. अमळनेरात पालिका निवडणुकीला गालबाेट लागले हाेते. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर तालुक्यातील पाच नेते निवडणूक अायाेगाच्या निगराणीखाली अाहेत. 
 
अामदार शिरीष चाैधरी, विधान परिषदेच्या अामदार स्मिता वाघ, काँग्रेसच्या प्रदेशस्तरीय पदाधिकारी अॅड. ललिता पाटील, माजी अामदार साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील हे पाच नेते निवडणूक अायाेगाच्या निगरानीखाली राहतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ते जेथे जेथे जातील, तेथे त्यांच्यासाेबत दाेन दिवस व्हिडिअाे कॅमेरामन यांच्यासह पाेलिस गार्ड राहणार अाहेेत. 

रावेर तालुक्यातील १० केंद्रे संवेदनशील 
रावेर तालुक्यात १० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घाेषित करण्यात अाली अाहेत. तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतपेटी अाणि कर्मचाऱ्यांना ने-अाण करण्यासाठी ३८ बसेस इतर १४ अशी ५२ वाहने कार्यरत असतील. भुसावळ तालुक्यातील दीपनगर अाैष्णिक वीजनिर्मिती केंद्र रेल्वे प्रशासनाने मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दाेन तासांची सुटी मिळणार अाहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी भुसावळात तहसील कार्यालयात घेण्यात अालेल्या अाढावा बैठकीत दिली अाहे. 

चाेपड्यात हजारर ३१४ कर्मचारी नियुक्त 
चाेपडा तालुक्यात १९९ मतदान केंद्र असून तीन मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली. तर लाख ७१ हजार २५५ मतदार हक्क बजावणार आहेत. तालुक्यात १९९ मतदान केंद्र आहेत. यातील चौगाव -विरवाडे गटात (३१),धानोरा- अडावद गटात (३६),चुंचाळे -अकुलखेडा गटात (३५),लासूर- घोडगाव गटात(२९),चहार्डी- बुधगाव गटात (३२) तर वर्डी- गोरगावले गटात (३६) मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी हजार ३१४ कर्मचारी नियुक्त केले आहेत. 

अमळनेरात पोलिस बंदोबस्त 
अमळनेर| पालिकेच्या गेल्या निवडणुकीत उसळलेली दंगल लक्षात घेता पोलिस प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पोलिस बंदोबस्तावर विशेष भर दिला आहे. बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक ३, सहायक निरीक्षक ११, कर्मचारी ३२६, महिला कर्मचारी १५, पोलिस मुख्यालयातील मतपेटी गार्ड पाच, एसआरपीएफ सेक्शन १४ कर्मचारी वाहनासह, आरसीपी क्र. ६- १२ कर्मचारी बंदोबस्त तैनात आहेत. या बंदोबस्तात अमळनेर, मारवड, रामानंदनगर, जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, नि. क. जळगाव, नंदुरबार, एटीसी, जळगाव, पोलिस मुख्यालय जळगाव, होमगार्ड, पीटीएस, मरोळ या ठिकाणावरून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. 

एरंडोल येथे प्रशासन सज्ज 
एरंडोल| तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन गटांतून १२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी २३ उमेदवार निवडणुकीत भवितव्य अजमावत आहेत. या मतदानात ९६ हजार ३२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विक्रम बांदल सहायक मतदान अधिकारी सुनीता जऱ्हाट सहा. झोनल ऑफिसर आपले कर्तव्य बजावत आहेत. एकूण १०२ मतदान बूथवर ६१२ कर्मचाऱ्यांची निवड झाली असून ६६ कर्मचारी राखीव ठेवले आहेत. यात १६८ पोलिस कर्मचारी ५० गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्य बजावत आहेत. यात डी.वाय.एस.पी., पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक अन्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

पारोळ्यात चाेख बंदाेबस्त 
पाराेळा| तालुक्यात लाख २३ हजार ५४४ मतदार असून १३१ मतदान केंद्र अाहेत. त्यात २८८ मतदान यंत्र सील करण्यात अाली आहेत. ७१५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व गट गण मिळून १७ बसेस जीपगाड्यांची व्यवस्था मतपेट्यांसाठी करण्यात अाली अाहे. बंदाेबस्तासाठी एक पाेलिस उपअधीक्षक, दाेन पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, १५१ पोलिस, ७५ होमगार्ड, एक ट्रॅकींग फोर्स तर अाठे वाहने पोलिसांची असतील. मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात करण्यात आले आहेत. 
------------------------
बातम्या आणखी आहेत...