आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचाली गतिमान, मतदार यादीचे अाॅक्टाेबरपासून पुनर्निरीक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव महापालिकेच्या अाॅगस्ट-सप्टेंबर २०१८मध्ये हाेणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असताना अाता प्रशासकीय हालचालींना देखील गती यायला लागली अाहे. निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांच्या पुनर्निरिक्षणाला लवकरच सुरूवात करण्यात येणार असून राज्य निवडणुक अायाेगाने पालिकेला सतर्क राहण्याचे निर्देश केले अाहेत. 
 
महापालिकेची २०१३मध्ये निवडणुक पार पडल्यानंतर त्यापाठाेपाठ लोकसभा विधानसभेची निवडणुक देखील झाली हाेती. २०१८मध्ये अर्थात पुढच्या वर्षी पालिकेची निवडणुक हाेणार असल्याने नुकतीच राज्य निवडणुक अायाेगाच्या सचिवांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व्हिडीअाे काॅन्फरन्सींगद्वारे सुचना दिली. अागामी काळात मतदार याद्या अद्यावत करण्यात येणार अाहेत. त्यानंतर प्रभाग रचना निश्चित केली जाणार अाहे. बिनचुक मतदार यादीनंतरच प्रभागांची रचना करणे प्रशासनासाठी साेयीचे ठरणार असल्याने निवडणूक अायाेगानेही मतदारांचे नाव पत्ते तपासण्याच्या सुचना केल्या अाहेत. 
 
वर्षभरापूर्वीच निवडणुकीचे वातावरण 
महापालिकानिवडणुकीला ११ महिने शिल्लक असले तरी आतापासूनच राजकीय घडामोडींना सुरूवात झाली अाहे. राजकीय पक्षांच्या भूमिका निश्चित नसल्या तरी चाचपणी सुरू अाहे. एकिकडे निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...