आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या भुसावळात विजेचा लपंडाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्याला१४२० मेगावॅट वीजेचा पुरवठा करणाऱ्या भुसावळ शहरातील ४० हजार वीज ग्राहकांना सध्या विजेच्या लपंडावाचा सामना करण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील विविध भागांमध्ये आपत्कालीन भारनियमन वाढले आहे. यासह सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहक वेठीस धरले जात आहेत. 
शहरात गेल्या पंधरवड्यापासून विविध फीडरवर विज भारनियमन केले जात आहे. या भागांतील विजगळती कमी आणि थकबाकी वसूलीचे प्रमाण अधिक असतानाही आपत्कालीन भारनियमन केले जात आहे. या प्रकरणी ग्राहकांनी विजबिलांची होळी करून महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून घेरावही घातला. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना अद्यापही गांभीर्य नसल्याची स्थिती कायम आहे. भुसावळ (दीपनगर) औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राज्याला १४२० मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. मात्र याच शहरातील ४० हजार ग्राहक सध्या भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे मेटाकुटीस आले आहेत. भुसावळ शहरात महावितरण कंपनीचे १३ वीज फिडर आहेत. त्यातील फिडर भारनियमनमुक्त असले तरी केवळ महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने फीडर अपग्रेडेशन केले नसल्याने शहरवासीयांना नाहक भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यासह वारंवार विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील गृहिणी, व्यापारी, दुकानदार, छोटे व्यावसायीक देखील हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीने फीडर अपग्रेडेशन करणे, तांत्रिक कारणांमुळे सातत्याने खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे आवश्यक आहे. गेल्या काळात मेंटनन्सच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्यामुळे उन्हाळ्यात शाश्वत विज मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. 

राजकीय अनास्थाही जबाबदार 
शहरातसध्या विजेचा लपंडाव आणि भारनियमन वाढले असतानाही लोकप्रतिनिधी गप्प आहेत. एकही राजकीय पक्ष किंवा संघटना या जनताभिमुख मागणीसाठी आंदोलन करीत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शहरातील जनता वाऱ्यावर आहे. राजकीय अनास्थेमुळे शहरातील नागरिकांना भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्याची झळ सोसावी लागत आहे. गरजेच्या काळात राज्याला वीजपुरवठा करून गरज भागवणाऱ्या भुसावळ शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

अडचणींबाबत एमईआरसीकडे तक्रार करू 
Ãफीडरअपग्रेडकरण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. त्यांच्या भोंगळ कारभारामुळे आता नाहक जनतेला वेठीस धरले जात आहे. याप्रकरणी आता एमईआरसीकडे तक्रार केली जाणार आहे. वीज ग्राहकांच्या न्याय्य मागण्यांबाबत लढा सुरूच ठेवू. प्रा.धीरज पाटील, श्रीनगर, भुसावळ 
 
बातम्या आणखी आहेत...