आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवाशांना पर्यायी जागा द्या, नंतर अतिक्रमण काढा; मोर्चेकरी आग्रही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील रेल्वेच्या अतिक्रमित जागेवरील झोपडपट्टी, अतिक्रमण हटवण्यापूर्वी तेथील रहिवाशांना पर्यायी जागा द्यावी, या मागणीसाठी पीआरपीसह दहा संघटनांनी सोमवारी घोषणाबाजी करत डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढला. पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी नेतृत्व केले. 
 
रेल्वे प्रशासनाकडून २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान अतिक्रमित जागेवरील झोपडपट्टी काढण्यात येणार आहे. मात्र, ही मोहीम राबवण्यापूर्वी रेल्वे विभागाने झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी घेवून पीआरपी दहा संघटनांनी सोमवारी डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढला. रेल्वेच्या जागेवरील संबंधित झोपडपट्टी ब्रिटीशकालीन आहे. येथील रहिवाशांनी पिढ्यांन््पिढ्या रेल्वेची सेवा केली आहे. असे असूनही झोपडपट्टी हटवून गरीबांवर अन्याय होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सन २००० पूर्वीच्या झोपडपट्टी पाडू नयेत, असे आदेश दिले आहेत. तरीही रेल्वे प्रशासन कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सोनवणेंनी केला. रेल्वेने अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील रहिवाशांना पर्यायी जागा द्यावी किंवा ९९ वर्षाच्या कराराप्रमाणे कायम जागा उपलब्ध करुन द्यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यांची होती उपस्थिती 
जगन सोनवणे यांच्यासह स्वीकृत नगरसेविका पुष्पा सोनवणे, माजी नगरसेविका नंदा निकम, साधना भालेराव, गणेश बारसे, बबलु सिद्दीकी, संतोष मेश्राम, हरिष सुरवाडे, चंद्रकला कापडणे, राजू डोंगरदिवे, विनोद निकम, सुनील ठाकूर यांनी डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चा करत रहिवाशांचा सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...