आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकर्सच्या सतर्कतेने महापालिकेच्या हाती काेणीच लागेना, 300 पेक्षा अधिकारी कर्मचारी रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -  दीडवर्षापासून पालिका प्रशासनाला जुमानणाऱ्या हाॅकर्सला वठणीवर अाणण्यासाठी साेमवारपासून पालिकेचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले अाहेत. पालिका संपूर्ण ताकदीनिशी कारवाई करणार म्हटल्यावर अाधीच सतर्क झालेल्या हाॅकर्सने एकही दुकान लावले नाही. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या हाती काहीही लागले नाही.
 
त्यामुळे पालिकेने हाॅकर्सची नाकाबंदी करण्यासाठी चक्क भाजीपाल्याचे अाेटे ताेडले. तसेच गल्लीबाेळात लपवलेल्या हातगाड्या पेट्या जप्त केल्या. दरम्यान, अचानक पालिकेचा ताफा अाल्याने किरकाेळ वादही झाला. बऱ्याच ठिकाणी हाॅकर्सची धांदल उडाली हाेती. 
 
महापालिकेने ख्वाजामियां झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हॉकर्सला स्थलांतरीत करण्याबाबत महासभेने ठराव केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने ७८२ हॉकर्सची सोडत काढून ख्वाजामियां झोपडपट्टीची जागा निश्चित केली आहे. त्यानुसार पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसह अतिक्रमण विभागाच्या ताफ्याने सकाळी वाजेपासून बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सधारकांचे स्थलांतर करण्याची मोहीम सुरू केली. मात्र, हॉकर्सधारकांनी विरोध केल्यामुळे काही वेळ शाब्दिक चकमक होऊन तणाव निर्माण झाला होता. बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी हॉकर्सला न्यू.बी.जे. मार्केट परिसरातील पर्यायी जागेवर स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु पर्यायी जागेवर व्यवसाय करता मूळ जागेवरच व्यवसाय सुरू आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई देखील करण्यात येत आहे. 
 
अशी अाहे विक्रेत्यांची स्थिती 
ख्वाजामियां झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याबाबत महासभेने ठराव केला. त्या अनुषंगाने ख्वाजामियां झोपडपट्टीच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले. तसेच बळीरामपेठेतील ३८३, सुभाष चौक ३०९ आणि शिवाजीरोड ९०, असे एकूण ७८२ हॉकर्सची सोडत काढून ख्वाजामियांॅ झोपडपट्टीच्या जागेवर त्या-त्या क्रमांकनिहाय जागा निश्चित केली गेली आहे. यामध्ये ४४४ भाजीपाला विक्रेते, १०२ फळ विक्रेते, ४० फूल विक्रेते १९६ अन्य किरकोळ विक्रेते असून स्थलांतर मोहीम सकाळपासून राबवण्यात आली. या वेळी अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांच्यासह सर्व विभागप्रमुख मोहिमेत सहभागी होते. 
 
पथकाला पाहताच पळापळ 
सुभाषचौक, बळीरामपेठ, शिवाजीरोड येथील हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी महानगरपालिकेचे पथक गेले होते. पथक दिसातच हॉकर्सची धावपळ सुरू झाली. अनेक हॉकर्सधारक आपआपले साहित्य घेऊन धावपळ करीत असल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, महात्मा गांधी मार्केट, शनिपेठ, भिलपुरा चौक, कुंभारवाडा या परिसरातील हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. 
 
महापौरांना निवेदन 
महानगरपालिकेनेकारवाईची मोहिम सुरू केल्याच्या निषेधार्थ हॉकर्सधारकांनी महापौर ललित कोल्हे यांची भेट घेतली. तसेच महापाैरांना निवेदन दिले आहे. हॉकर्सधारकांना जुन्या नगरपालिकेच्या जागेवर पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे केली. हाॅकर्सचे नेतृत्व कांॅग्रेसचे विष्णू घाेडेस्वार यांनी केले. हाॅकर्सला ख्वाजामियांॅची जागा परवडणारी नसल्याने त्यांना शहरातील नगरपालिकेची अथवा साने गुरुजी रुग्णालयाची जागा व्यवसायासाठी देण्याची मागणी करण्यात अाली. 
 
वादामुळे तणावाची स्थिती 
शनिपेठ परिसराच्या मागील गल्लीत साहित्य भाजीपाला विक्रेत्यांकडून जप्त करताना विक्रेता आणि महापालिकेचे पथक यांच्यात शाब्दिक चकमक होऊन गोंधळ निर्माण झाला होता. परिसरात खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, काही विक्रेत्याचे शेडदेखील काढण्यात आले. बळीरामपेठेतील रस्त्याला लागून असलेले अनेक पक्के शेड काढण्यात अाल्याने हा परिसर माेकळा झालेला पाहायला मिळाला. 
बातम्या आणखी आहेत...