आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजबजलेला शिवाजी राेड १०० वर्षांत प्रथमच १० फूट मोठा होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या अाठवड्यात महापालिका अायुक्तांना दिलेल्या शब्दाचे पालन करत शिवाजी राेडवरील दुकानदारांनी रविवारी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे हा गजबजलेला रस्ता तब्बल १०० वर्षांनंतर १० फुटांनी माेठा अन् मोकळा हाेणार अाहे. दुकानदारांनी दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांसमाेर चांगला अादर्श उभा राहिला अाहे.
त्यामुळे पालिकेकडून हाेणारी ताेडफाेड टळणार अाहे. अतिक्रमण काढल्यानंतर मात्र पालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली असून साेयी-सुविधा देण्याची अपेक्षा व्यक्त हाेत अाहे.
मागच्या अाठवड्यात मनपाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट गल्ली असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राेडवरील अतिक्रमणाची पाहणी केली हाेती. त्या वेळी अायुक्त संजय कापडणीस यांनी प्रत्येक दुकानासमाेर जाऊन दुकानमालकांना दुकानाच्याबाहेरील सर्व अतिक्रमण काढून घ्या; अन्यथा साेमवारी जेसीबीने ताेडण्याचा इशारा दिला हाेता. त्यानंतर या रस्त्यावरील १०० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी अाम्ही स्वत: अतिक्रमण काढून घेऊ, असे अाश्वासन दिले हाेते. त्यानुसार रविवारच्या सुटीमुळे ग्राहकांची वर्दळही कमी असल्याने सकाळपासून दुकानाच्या शटरपासून पुढे टाकण्यात अालेले शेड अाेटे ताेडण्यास सुरुवात केली होती. दुपारी वाजेपर्यंत निम्म्या दुकानांपर्यंतचे अतिक्रमण काढून घेतले हाेते. शहरातील मजुरांसह लाेखंडी काम करणाऱ्या मजुरांना बाहेरगावाहून बाेलावले हाेेते.

दुकानदारांची कौतुकास्पद कामगिरी
पालिकाप्रशासन सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत असल्याने शिवाजी राेडवरील संदीप मंडाेरा, जितेंद्र मुंदडा विजय जाेशी यांच्यासह काही दुकानदारांनी स्वत: पुढाकार घेत अतिक्रमण स्वत:च काढून घेण्याचे अावाहन केले. त्यानुसार या मार्गावरील दाेन्ही बाजूच्या दुकानदारांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. यात एका बाजूचे शेड तर दुसऱ्या बाजूला अाेटे ताेडण्याचे काम करण्यात अाले.

दुकानदारांनी सकारात्मकता दाखवत १०० वर्षांपासून व्यवसाय सुरू असलेल्या जागेचा ताबा साेडण्याची तयारी दाखवली अाहे. अाता दुकानदारांच्या थेट शटरपर्यंत ताेडफाेड केली जाणार अाहे. परिणामी, दुकानात ग्राहकांना उभे राहायलाही जागा उरणार नाही, अशी स्थिती अाहे. त्यामुळे पालिकेने तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. गटारीचे स्थलांतर तसेच रस्त्याच्या रुंदीनुसार दुभाजक टाकणे, डांबरीकरण करणे अादी कामांना पावसाळ्यापूर्वीच तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी हाेत अाहे.

अामची जबाबदारी पूर्ण केली
गेल्या१००वर्षांपूर्वी अामच्या पूर्वजांनी व्यवसाय सुरू केला हाेता. ताे अाम्ही पुढे नेत अाहाेत. या रस्त्यावरील वर्दळ रहदारी पाहता अाम्ही स्वत: रस्ता माेकळा करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. आम्ही अामची जबाबदारी पूर्ण करताेय. अाता महापालिकेने त्यांची जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे. विजय जाेशी, व्यावसायिक