आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी नसलेले आरसीसीचे पक्के व्यापारी गाळे जमीनदोस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नकाणेराेडवर परवानगी घेता अनधिकृतपणे उभारलेल्या अारसीसीच्या पक्क्या व्यापारी गाळ्यांचे बांधकाम जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात अाले. त्याचबराेबर रामचंद्रनगरातील पत्र्यांचे अतिक्रमित शेड काढण्यात अाले. त्याचबराेबर नवरंग जलकुंभानजीक दाेन दिवसांपूर्वी ४९ अतिक्रमणे काढल्यानंतर या जागेवर महापालिकेतर्फे संरक्षणासाठी चारही बाजूंनी पत्रे ठाेकली जात अाहेत. त्यामुळे या जागेवर अाता अतिक्रमण हाेणार नाही. त्याच वेळी सरदार उर्दू हायस्कूलजवळील व्यापारी संकुलाचे काम मात्र अर्धवटच ताेडण्यात अाले अाहे. गुरुवारी हे संकुल ताेडताना नागरिकांनी दगडफेक केली हाेती. शुक्रवारी मात्र त्यावर कारवाई झाली नाही. 
 
शहरात बाजार समितीच्या परिसरातील रामचंद्रनगरात रस्त्यावर पत्र्यांच्या शेडचे अतिक्रमण काढण्यात अाले. दुपारी जेसीबीने ते काढण्यात आले. त्यानंतर नकाणे मार्गावरील अारक्षण असलेल्या जागेवरील सहा व्यापारी गाळ्यांचे बांधकामही पाडण्यात अाले. हे बांधकाम विनापरवानगी झाले हाेते. त्यानुसार बांधकामधारकांना मनपाने नोटीस दिली होती. अखेर ते अनधिकृत बांधकाम दुपारी जेसीबीच्या साह्याने ताेडण्यात अाले. आरसीसीचे पक्के बांधकाम असल्याने तोडायला वेळ लागला. हे व्यापारी संकुल मालक विजय चांडक त्यांचे भागीदार राहुल सोनवणे, के.डी.मिस्तरी यांच्या मालकीचे आहे. 

चुकीचे आरक्षण... 
^बांधकामासाठी प्रस्ताव
सादर केला. त्याला एक ते दीड वर्षाचा कालावधी उलटला. मात्र, परवानगी मिळाली नाही म्हणून बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले, तर मनपाच्या नगररचना विभागाने ही जागा गवळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी आरक्षित केली. शहर आराखड्यात तसे दाखविले आहे. यामुळे परवानगी दिलेली नाही. तसेच रोडलगतची जागा चुकीने आरक्षणात दाखवली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुणे येेथे पाठविले आहे. विजयचांडक, व्यापारी-गाळेधारक 
 
नवरंग जलकुंभाची जागा केली महापालिकेने संरक्षित 
नवरंगजलकुंभाजवळील जागेवरून फळविक्रेत्यांसह जवळपास ४९ जणांची अतिक्रमणे काढल्यानंतर शुक्रवारी मनपाने या जागेला पत्र्यांचे कुंपण ठाेकायला सुरुवात केली. यामुळे ही जागा मनपासाठी सुरक्षित राहणार अाहे. मुळात या माेकळ्या जागेवर शहरातील महत्त्वाकांक्षी असणाऱ्या पाणीपुरवठा याेजनेचे साहित्य पडून अाहे. 

देवपूर परिसरातील नवरंंग जलकंुभाजवळ महापालिकेच्या मालकीची जागा आहे. सध्या ही जागा माेकळी पडली अाहे. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी पत्र्यंाचे कुंपण करण्याचे काम दुसऱ्या दिवसापासून करण्यात येत आहे. देवपूर भागातील ही मोकळी जागा अतिशय महत्त्वाची आहे. याच जागेवर तत्कालीन आयुक्त दौलत पठाण यांनी पालिका बाजार स्थापन करण्याचे नियोजन केले होते. तेथे या भागातील फेरीवाले व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर ओटे बांधून देण्याची योजना तयार केली होती. ताे विषय मनपाच्या सभेतही मंजूर करण्यात आला होता. मात्र, ते काम नंतर बारगळले आहे. आता ही जागा अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी कुंपण केल्याने येथील व्यावसायिक थेट रस्त्याच्या कडेला बसत आहेत. 

एकहेक्टर जागा 
नवरंगजलकंुभा जवळील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही अतिशय मोक्याची जागा असून, या जागेला दोन्ही बाजूने रस्ते जातात. व्यावसायिक दृष्टिकोनातून ती महत्त्वाची आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ साधारणपणे हेक्टर इतके अाहे. 

जागेवरआहे आरक्षण 
याएक हेक्टर जागेवर प्राथमिक शाळा उर्वरीत भागात बगिच्याचे आरक्षण आहे, तर महापालिकेला या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने एल आकारात व्यापारी गाळे बांधावयाचे आहेत. त्याकरिता जागेच्या आरक्षणात बदल करून येथे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. मुुंबई-आग्रा रोड जलकंुभाकडे जाणाऱ्या या रस्त्यालगत साधारणपणे ऐंशी ते नव्वद व्यापारी गाळे उभारता येऊ शकतात. 

प्रथमचकारवाईनंतर केले कुंपण 
महापालिकेनेआतापर्यंत अतिक्रमणे काढण्याची कारवाई शहरात अनेकदा केली आहे. त्यात मोकळ्या जागांबाबतही कारवाई केली आहे. मात्र, पहिल्यांदाच मैदानालगत अतिक्रमण काढल्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून पत्र्यांचे कुंपण केल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील इतर भागातील मोकळ्या जागांवरही काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तेही काढण्याची गरज आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...