आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्याय सहन केल्यामुळेच त्रास वाढतो, सरकारी वकील अनुराधा वाणी यांचा महिलांना सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावदा- महिलांना कधी ना कधी घरगुती किंवा सार्वजनिक जीवनात त्रास सहन करावा लागतो. महिला हा त्रास मुकाट्याने सहन करतात म्हणून त्यात वाढ होते. अन्याय सहन करू नका. त्या विरुद्ध हिंमतीने आवाज उठवा, असा सल्ला जळगाव येथील सरकारी वकील अनुराधा वाणी यांनी सावद्यात दिला. 
 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावदा पालिकेने महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. नगराध्यक्षा अनिता येवले यांच्याहस्ते शिबिराचे उद््घाटन झाले.डॉ.प्रियदर्शनी सरोदे, मंगला देशमुख, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा नेहा गाजरे, उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, मुख्याधिकारी अमोल बागुल, सर्व नगरसेविका क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती.
 
शिबिरात बोलताना अॅड.अनुराधा वाणी यांनी, घरात नव्याने लग्न होऊन आलेल्या महिलेस अनेक प्रकारे त्रास दिला जातो. पण त्याच कुटुंबात असलेल्या इतर स्त्रियांनी या गोष्टीस विरोध करावा. बदलाची सुरुवात स्वत:पासून करावी, असा सल्लाही त्यांनी अावर्जून दिला. 
 
शंकांचे समाधान : अॅड.वाणी यांनी महिलांविषयक कायदे अतिशय सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगितले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील दिली. 
 
स्पर्धांना प्रतिसाद 
कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरानंतर महिलांसाठी मेंहदी, रांगोळी, सुदृढ बालक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटातील महिलांनी त्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 
बातम्या आणखी आहेत...