आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत भावाकडे जायचेय सांगत, तरुण अभियंत्याची अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मृत भावाकडे जायचे अाहे, असे मित्रांशी बाेलत काही दिवसांपासून चिंतेत राहणाऱ्या नकाणे राेडवरील श्रद्धा नगरातील तरुण अभियंत्याने काल मंगळवारी रात्री गळफास घेऊन अात्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस अाला. मृत स्वप्निल अहिरे यांच्या भावाचा दाेन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील ताेरणमाळ येथील सीताखाईत संशयास्पद मृत्यू झाला हाेता. संबंधित अभियंता खासगी बांधकामाचे ठेके घ्यायचा. त्यांचा एक भाऊ पराग अहिरे हेही खासगी बिल्डर्स क्षेत्रात कार्यरत अाहेत. 
 
श्रद्धा नगरातील प्लाॅट नं. ४३ मध्ये राहणारे अभियंंता स्वप्निल सुभाष अहिरे (वय ३५) यांनी घरी रात्री केव्हातरी गळफास घेऊन अात्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लक्षात अाला. स्वप्निलचा भाऊ पराग अहिरे यांनी त्यांना हिरे मेडिकल काॅलेज येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डाॅ. सिद्धार्थ पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घाेषित केले. स्वप्निल अहिरे हे पाटबंधारे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह खासगी बांधकामाचे कामे करीत. त्यांच्या अात्महत्येची माहिती समजताच बांधकाम क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. स्वप्निल अहिरे हे अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांचे चिरंजीव अाहेत. त्यांच्या पश्चात अाई, वडील, भाऊ, पत्नी मुलगा, बहीण असा परिवार अाहे. त्यांनी नेमकी अात्महत्या का केली असावी याबाबत काेणतीही माहिती नाही. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात अाले. दरम्यान, स्वप्निल अहिरे यांच्या एका भावाचा दाेन वर्षांपूर्वी ताेरणमाळ येथे खाईत ढकलून देऊन खून करण्यात अाला हाेता. तर दुसरे बंधू पराग अहिरे हेही बांधकाम क्षेत्रात कार्यरत अाहेत. त्यामुळे स्वप्निल अहिरे यांच्या अात्महत्येमुळे त्यांच्या परिवाराला माेठा धक्का बसला अाहे. ते काही दिवसांपासून चिंतेत हाेते. तसेच अापल्या जवळच्या मित्रांजवळ ते नेहमीच अापल्याला भावाकडे जायचे अाहे, असे बाेलत असल्याचे त्यांच्या काही मित्रांनी सांगितले. यासंदर्भात काॅन्स्टेबल ईशी यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली अाहे. तपास सहायक उपनिरीक्षक ए. पी. पाटील करीत अाहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...