आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

photoS: व्यक्तिचित्रांनी प्रेक्षक संमोहित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रसिद्ध चित्रकार गणपत भडके यांनी रेखाटलेल्या हुबेहूब व्यक्तिचित्राने प्रेक्षकांना मोहिनी घातली. रविवारी केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला विभागातर्फे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे ‘गुडविल’ या पेंटिंग, ग्राफिक, फोटोग्राफी चित्रपटनिर्मिती प्रदर्शनाचा समारोप झाला. ते जूनदरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन लेवा बोर्डिंग हॉल येथे करण्यात आले होते. रविवारी प्रसिद्ध चित्रकार गणपत भडके (मुंबई) यांच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.
यात त्यांनी तैलरंगात स्त्री व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक केले. समारोप प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, प्राचार्य अविनाश काटे उपस्थित होते. या वेळी पोलिस अधीक्षकांचेही तैलरंगात व्यक्तिचित्रण करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रा. योगेश लहाने, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ, प्रा.गावंडे, प्रा.फेगडे, हेमराज सोनवणे, विशाखा सपकाळ, गायत्री विसपुते, राजू भुईकर, चेतन पाटील यांचे सहकार्य मिळाले.
पेंटिंगमध्ये करिअर करायचे असेल तर अनुभव आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची आहे. रिअॅलिस्टिक पोर्ट्रेटमध्ये खूप मेहनत करावी लागते. दररोज तुम्ही तुमच्या कामात प्रयत्न करायला हवेच तसेच त्यात सातत्यही हवे. आजकाल विद्यार्थी पटकन वरची उडी मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते साध्य होत नाही. त्यापेक्षा मेहनत करा. प्रत्येक माध्यमाचे काम वेगळे असते. ऑइल, पोस्टर दोघेही रंग वेगवेगळे काम करतात. पुस्तकी शिकण्यापेक्षा प्रात्यक्षिकांवर भर द्या. आम्ही जे प्रात्यक्षिक सादर करतो, त्यामधून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण होतो.
प्रत्येकदा कॅनव्हास, रंग हे परिस्थितीशी अनुकूल असतात, असे नाही. परंतु, सगळे सांभाळत प्रात्यक्षिक द्यावेच लागते. यामधूनही अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे गणपत भडके यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आणखी काही व्यक्तिचित्र...
बातम्या आणखी आहेत...