आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना द्यावी लागली शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- धरणातूनपाणी उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना सूचना देता लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी जवळपास १५० पाइप तोडले होते; परंतु या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या केलेल्या नुकसानाची भरपाई द्यावी लागली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत कैफियत मांडली होती. याबाबत जलसंपदामंत्री महाजन यांनी तंबी देताच सोमवारी या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना १५० पाइप घेऊन दिले.

यंदा पावसाअभावी दुष्काळी स्थितीचा सामना करण्याची वेळ आल्याने धरणांतील जलसाठा राखून ठेवा, असे आदेश जलसंपदामंत्री महाजन यांनी दिले होते. त्यामुळे शाखाधिकारी बी.एस.पाटील, विजय पाटील अन्य तीन कर्मचाऱ्यांनी गोंडखेळ येथील दोन मजूर लावून शनिवारी (दि.१५) हिजऱ्या नाला धरणावरून पाणी उचल करणाऱ्या ३० ते ४० शेतकऱ्यांचे दीडशेहून अधिक पाइप तोडले. आधीच दुष्काळी स्थिती त्यातच कोणतीही पूर्वसूचना देता लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाइप फोडून जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

गोंडखेळ येथील ३० ते ४० शेतकऱ्यांचे दीडशेहून अधिक पाइप ताेडल्याचे शेतकऱ्यांनी सांगताच मंत्री महाजन यांनी लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर.टी.पाडळसे यांना बोलावून घेतले. तसेच कारवाईपूर्वी नोटीस दिली होती किंवा नाही? अशा प्रकारची कारवाई करून नुकसान करण्याचा काय अधिकार? आदी प्रश्नांची सरबत्ती करत चांगलीच कानउघाडणी केली शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

न्याय मिळाला
लघुपाटबंधारेविभागाची परवानगी घेऊन पाणी उचल करत होतो. अधिकाऱ्यांनी कारवाई केली तोपर्यंत धरणाला डबक्याचे स्वरूप आले होते. अत्यल्प पाणी गाळ शिल्लक असताना केलेल्या कारवाईमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. संदीपराजपूत, शेतकरी, गोंडखेळ

राज्यात पहिलाच प्रकार
कुठलीहीनोटीस किंवा पूर्वसूचना देता शेतकऱ्यांचे पाइप तोडल्याने त्याची नुकसानभरपाई करून देण्याची नामुष्की लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. जलसंपदामंत्र्यांच्याच तालुक्यात घडलेला हा प्रकार निंदनीय असून, अधिकाऱ्यांना भरपाई द्यावी लागल्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकार असावा, असे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी देण्यात येणारे पाइप वाहनात टाकताना कर्मचारी, सोबत उपस्थित शेतकरी.