आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा, बैलगाड्यांचाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर-7/12 उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतीमालाला आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे, भाजप सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणांनी अमळनेर तालुक्यातील पांझरा काठ परिसरातील लोणमुडी झाडी गळवाडे, भरवस, लोणग्रुप भागातील शेतकऱयांचा कर्ज माफी व विविध मागण्यांसाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दालनातून बाहेर येत निवेदन स्वीकारले. थेट कचेरीवर बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
 
सरकारचा निषेधपर घोषणा देत हा मोर्चा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच हलाकीची असतांना सध्या स्थितीत असलेले राज्य सरकार कर्ज माफी देण्याच्या पावित्र्यात नसल्याने अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला स ११ वाजता एकत्र येऊन तेथून जिजाऊ चौक ते तहसिल कार्यलय वर जाऊन कर्ज मुक्तीसाठी व इत्तर मागण्यांसाठी तहसिलदार यांना या संदर्भात निवेदन देणात आले. 
 
या दरम्यान कायदा सुव्यस्थेचे पालन करत शिस्तबद्ध शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. या निवेदनात लोण सिमचे सुनील गुलाबराव पाटील, शशिकांत भालचंद्र पाटील, अशोक साहेबराव पाटील, विवेक पतींगराव पाटील, चंद्रकांत गंगाराम पाटील, राहुल लक्ष्मीकांत पाटील सर्व रा. लोण, संजय त्र्यंबक पाटील चौबारी, प्रभाकर पाटील, चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, लोण चारंमचे नाना पाटील, लोण बु. चे समाधान पाटील, हिरामण पाटील, गौरव उदय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, संजय पुनाजी पाटील पिंपळे बु, धनगर दला पाटील, कळमसरे चे शिवाजी राजपूत, ढेकू चे नीलकंठ पाटील, विनायक सीताराम पाटील एकलहरे, रामलाल पाटील, वसंत रामलाल राठोड, रवींद्र गुणवंत पाटील  यांच्या सह्या आहेत. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, विधिमंडळ अथवा बाहेर शेती आणि कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारले कि कोट्यावधीची पेकेज जाहीर होतात शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर असताना मदतीच्या अपेक्षेत असलेल्या अल्पभूधारक, कर्जबाजारी, व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हे आकडे दिलासादायक वाटत नाही.
 
सरकारने ज्यापद्धतीने स्वप्न व आश्वासन दाखवून आपण सत्तेवर आला त्यापैकी जनतेच्या दृष्टीने या प्रशासनात तिळमात्र बदल झाल्याचे दिसत नाही अमळनेर तालुक्याचा बहुतांश भाग हा दुष्काळसदृश्य असताना देखील शेतकरी कर्जमुक्तीबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी कुठेच बोलताना दिसत नाही मात्र कर्जमाफीबाबत व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोटही लवलेश दिसत नाही यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत झालेल्या मतदीची वेबसाईट सुरु करावी जेणेकरून कुणाला किती मदत केली हे कळेल यासाठी सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...