आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांभूर्णीच्या शेतमजुराची आत्महत्या, चिठ्ठी मिळाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 यावल - तालुक्यातील डांभूर्णी येथील शेतमजुराने उंटावद शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडीस आला. चंद्रकांत रामराव पाटील (वय ४५) असे मृताचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत उधारी असलेल्यांची नावे दिली आहेत. 
चंद्रकांत पाटील हे कुपनलिका दुरूस्तीचे काम करायचे. शनीवारी ते उंटावद शिवारातील संजय दिनकरराव पाटील यांच्या शेतातील कुपनलिका दुरूस्तीला गेले होते. मात्र, सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते कुपनलिका दुरूस्तीसाठी लावलेल्या लोखंडी घोडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. 
 
पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांच्याजवळ चिठ्ठी सापडली. त्यात उधारी घेणे बाकी असलेल्यांची नावे आहेत. उंटावद पोलिस पाटील सुरेश पाटील यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. सहायक फौजदार रवींद्र साळी, विकास सोनवणे तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...