आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडू पुढे गेले तरच क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा लौकिक, उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एबीसी क्रीडा मंडळाच्या वतीने स्व. मनदीपसिंग परमार यांच्या स्मरणार्थ आयोजित निमंत्रित खुल्या राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत विजय मिळवलेल्या महाराष्ट्र पोलीस संघास करंडक प्रदान करताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया - Divya Marathi
एबीसी क्रीडा मंडळाच्या वतीने स्व. मनदीपसिंग परमार यांच्या स्मरणार्थ आयोजित निमंत्रित खुल्या राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत विजय मिळवलेल्या महाराष्ट्र पोलीस संघास करंडक प्रदान करताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया
नगर - नगर सारख्याछोट्या ठिकाणी बास्केट बॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी एबीसी ग्रूपच्या वतीने मागील वर्षांपासून चळवळ सुरू झाली. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने आयोजित केलेली ही चांगल्या दर्जाची राज्यस्तरीय स्पर्धा लोकांच्या मनोरंजनाबरोबरच नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे. नगर हळूहळू क्रीडा क्षेत्रात पुढे येत आहे. अशा छोट्या छोट्या ग्रूपने पुढे येऊन विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले. 
 
एबीसी क्रीडा मंडळाच्या वतीने स्व. मनदीपसिंग परमार यांच्या स्मरणार्थ आयोजित निमंत्रित खुल्या राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी फिरोदिया बोलत होते. खेळ खेळाडू पुढे गेले, तरच खेळाच्या क्षेत्रात नगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होईल, असे त्यांनी सांगितले. 
 
यावेळी व्यासपीठावर एबीसीचे अध्यक्ष पीयूष लुंकड, राणाशेठ परमार, मर्चंट बँकेचे अध्यक्ष एस. झेड. गांधी, डिक गॉडविन, डॉ. भूषण अनभुले, डॉ. हर्षवर्धन तन्वर, अमित मुथा, विशाल शेटिया, आनंद बोरा, मिलिंद नलवडे, अमित पिरोही आदी मान्यवर उपस्थित होते. हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत राज्यभरातील २० संघ सहभागी झाले. पुढील स्पर्धा यापेक्षाही व्यापक स्वरूपात भरवण्यात येणार असल्याचे लुंकड यांनी यावेळी सांगितले. 

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना इंडियन नेव्ही महाराष्ट्र पोलिस यांच्यात खेळाला गेला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत महाराष्ट्र पोलिस संघाने इंडियन नेव्ही संघावर सतरा गुणांनी विजया मिळवत करंडक पटकावला. त्यांना नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने एबीसी ग्रूपचे सदस्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते. .
बातम्या आणखी आहेत...