आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायटरने मारहाण करून विद्यार्थ्याचे डोके फोडले;शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) बुधवारी 1 दुपारी वाजता एका विद्यार्थ्याला तिघांनी फायटरने मारहाण करून त्याचे डोके फोडल्याची घटना घडली. विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून मारहाण करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. 
 
सावखेडा शिवारातील शांतीनगर येथील रोहित गुलाबराव सूर्यवंशी (वय १६) हा शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात फिटर ट्रेडचे शिक्षण घेत आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आयटीआयमध्ये आल्यानंतर दुपारी 1 वाजता रोहित त्याच्या मित्रांसोबत वर्कशॉपमध्ये बसला हाेता. त्याचवेळी चेतन वारके(रा. पार्वतीनगर), कृष्णा शेकोकर (रा. हरिविठ्ठल) हे विद्यार्थी त्यांच्या एका मित्रासोबत दारूच्या नशेत त्या ठिकाणाहून जात असताना रोहित त्याचा मित्र यांनी त्यांच्याकडे पाहिले. पाहिल्याचा राग येऊन चेतन आणि कृष्णा यांनी ‘तू काय पाहतो,’ असे विचारून रोहितला शिवीगाळ केली. यानंतर दोघांनी काही कारण नसताना रोहितला मारहाण करून डोक्यात फायटरने वार करून डोके फोडले. रोहित याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव सुरू झाल्याचे पाहून चेतन, कृष्णा त्याच्या मित्राने पळ काढला. यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी जमल्यानंतर रोहितला त्याच्या मित्रांनी लागलीच खासगी रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन तिघांच्या विराेधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...