आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत जर स्वारस्य नसेल तर राज्यपालांकडे राजीनामे द्या, गुजराथी, वळसे-पाटील यांनी गाजवली सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहार्डीत अाघाडीच्या सभेत बाेलताना दिलीप वळसे-पाटील. तर व्यासपीठावर अरुण गुजराथी, अॅड. संदीप पाटील, गाेरख पाटील. - Divya Marathi
चहार्डीत अाघाडीच्या सभेत बाेलताना दिलीप वळसे-पाटील. तर व्यासपीठावर अरुण गुजराथी, अॅड. संदीप पाटील, गाेरख पाटील.
चाेपडा - सत्तेतस्वारस्य नसेल तर थेट राज्यपालांकडे राजीनामे देण्याची हिंमत दाखवा, असे अाव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी शिवसेनेला दिले. चाेपडा तालुक्यातील चहार्डी येथे साेमवारी झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही सेना-भाजपवर परखड टीका केली. युतीच्या नेत्यांनी जळगाव जिल्ह्याला निव्वळ राजकारणाचा अड्डा केल्याने विकास खुंटला, असेही त्यांनी नमूद केले. 
 
विचारमंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, मंगा कंखरे, चाेसाकाचे माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील, चंद्रहास गुजराथी, नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गोरख पाटील, आशिष गुजराथी, पक्षनिरीक्षक किरण शिंदे, राजेंद्र पाटील, जीवन चौधरी, हितेंद्र देशमुख, प्रा. नीलम पाटील, मालुबाई कोळी, कल्पना पाटील, आनंदराव रायसिंग, राजाराम पाटील, सुरेश पाटील, कांतीलाल पाटील, किशोर पाटील, उषा पाटील उपस्थित होते.जळगाव जिल्हा परिषदेत कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. रस्ते पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा, पुरवल्या गेल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा काळा पैसा बाहेर काढणार होते; पण तसे झाले कुठे? देशात राज्यात शिक्षणाचे भगवीकरण करण्याचा घाट या सरकारने घातला अाहे. शिवसेना, भाजपचे राज्यात सुरू असलेले भांडण हे तात्पुरते अाहे, असा चिमटाही वळसे-पाटील यांनी घेतला. चोपडा तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सहापैकी चार जागा गतवेळी मिळाल्या होत्या. मात्र, अाता सर्व जागा जिंकण्याची जबाबदारी अरुण गुजराथींवर अाहे, असेही त्यांनी या सभेत नमूद केले. 

जगदीश वळवींची अाठवण 
माजी अामदार जगदीश वळवी हे इच्छा नसताना भाजपमध्ये गेले. मात्र, ते पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये परत येतील, अशी अाशा वाटते, असे सूताेवाच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. त्यामुळे विचारमंचावरील नेत्यांसह उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावल्या. कांॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनीही या सभेत तडाखेबाज भाषण करून लक्ष वेधून घेतले. काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, नेते व्यासपीठावर उपस्थित हाेते. वळसे-पाटील यांनी अापल्यावर टाकलेली जबाबदारी अापण पूर्ण करून दाखवू, असा प्रबळ अात्मविश्वासही अरुण गुजराथी यांनी या सभेत व्यक्त केला. 
 
काेण काय म्हणाले? 
अॅड.संदीप पाटील : शिवसेना-भाजप नेत्यांकडून असंवैधानिक भाषा प्रचारात वापरली जात अाहे. जिल्हा परिषदेवर १५ वर्षांपासून या दाेन्ही पक्षांची सत्ता असल्याचे विकास खुंटला. सत्तांतराशिवाय अाता पर्याय नाही. नाेटबंदीमुळे सर्वाधिक त्रास कष्टकरी शेतकऱ्यांना झाला. महागाई कमी झालेली नाही. रस्त्यांचा प्रश्न बिकट असल्याने जनता सत्ताधाऱ्यांना नक्कीच जाब विचारणार. 

अरुण गुजराथी : देशभरासहराज्यात अाता माेदी लाट अाेसरली अाहे. विश्वासघात करणाऱ्या शिवसेना-भाजपला जनता अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. शिवराळ भाषा कशी असते? याचा अभ्यास जर कुणाला करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण एेकावे. लाेकशाहीचे वस्त्रहरण हाेत असून ते अजिबात याेग्य नाही. 
बातम्या आणखी आहेत...