आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावामधील डाॅ.धर्मेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर खोऱ्यातील 3700 रुग्णांवर उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जळगाव - जम्मूकाश्मीर मधील अतिरेकी कारवायांची तमा बाळगता तेथील जनतेचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आपलेसे करावे, या उद्देशाने बाॅर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून जळगावमधील नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ.धर्मेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील १० डाॅक्टरांच्या पथकाने १० ते २० मे या कालावधीत काश्मीर खोऱ्यात मोफत रुग्णसेवा दिली. या शिबिरादरम्यान सुमारे ३७०० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्रथमाेपचार करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरचा आरोग्य विभाग, भारतीय सेना यांच्या सहकार्याने फाउंडेशनने आरोग्य शिबिर घेतले. 
 
बाॅर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम यांच्या विचारांशी जुळलेले संस्थेचे समन्वयक डाॅ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह जळगावातील स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.जितेंद्र मोरे, नाशिकचे डाॅ.मधुकर आचार्य, डाॅ.रामदास भोई, डाॅ.शेखर मगर, डाॅ.सुदेश बोरा, डाॅ.सचिन भांबरे व्यवस्थापक हृषिकेश परमार यांची टीम तयार केली होती. त्यांनी जम्मू काश्मीरमधील बिरवाह, नार्बल (बडगाम सेक्टर), अजस (सुंभल सेक्टर), त्रेहगाम (कुपवाडा सेक्टर), छानपुरा, द्रास, कारगिल, श्रीनगर, छत्तरगुल, कंगन (बांदरगल सेक्टर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शिबिर घेऊन रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. जळगावहून डाॅ. पाटील नाशिक येथून हृषिकेश परमार यांनी अाैषधी पुरवठा केला. 
 
एक लाखांचा औषध पुरवठा 
शिबिरासाठी कमांडिंग ऑफिसर, १३ राष्ट्रीय रायफल बांदीपुरा डिस्ट्रिक्ट, ४४ राष्ट्रीय रायफल कुपवाडा डिस्ट्रिक्ट, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन, २४ राष्ट्रीय रायफल बिहार बटालियन यांनी सहकार्य केले. अजस येथे कॅप्टन अजय (पुणे), कुपवाडा येथे कमांडिंग ऑफिसर हेमंत मेजर स्वप्नील खडक (नागपूर) यांनी डाॅक्टरांच्या पथकाला भारतीय सैन्य कशाप्रकारे काश्मिरी जनतेला मदत करते, हे सांगितले. दरम्यान, बिरवाह येथे आरोग्य शिबिर सुरू असताना मोठा निषेध मोर्चा निघाला. तेव्हा स्थानिक जनता रुग्णांनी डाॅक्टरांच्या चमूला वेढा घातला संरक्षण देऊन शिबिर पार पाडले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...