धुळे- शहरातील मच्छीबाजार भागात झालेली दंगल दाेन समूहात झालेली हाेती. पाेलिस अाणि एका समूहात ती झाली नव्हती, अशी माहिती काेल्हापूरचे पाेलिस अधीक्षक तथा तत्कालीन पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चाैकशी अायाेगासमाेर साक्षीत उलटतपासणीत दिली.
शहरातील एका भागात झालेल्या दंगलीच्या चाैकशीसाठी शासनाकडून निवृत्त न्यायाधीश के.यू.चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चाैकशी अायाेगाची नियुक्ती करण्यात अाली अाहे. या समितीचे कामकाज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महािवद्यालयात सुरू अाहे. त्यात शुक्रवारी सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी प्रदीप देशपांडे यांची सरतपासणी घेतली. तसेच दाेन्ही गटांकडून अॅड. जी.बी.गुजराथी अॅड.प्रकाश परांजपे यांच्याकडून उलटतपासणी घेण्यात अाली. या वेळी त्यांना दंगलीसंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात अाले. त्यात पाेलिस दलातील स्थिती, २००८ अाणि २०१३मध्ये झालेल्या दंगलीवेळी करण्यात अालेल्या कारवाईची तुलनात्मक माहिती, जातीय सलाेख्यासाठी करण्यात अालेले प्रयत्न, दंगलीच्या काळातील पाेलिसबळ अाणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली साधने, शांतता कमिटीच्या बैठका, २०१२मध्ये शहरात पसरलेल्या एका अफवेनंतर घेण्यात अालेली खबरदारी, दंगलीच्या काळातील राजकीय प्रसारमाध्यमांची भूिमका अादींचा समावेश हाेता. या माहितीसह पाेलिस दल जास्त संख्येने असल्यास त्याचा जमावावर परिणाम हाेत असताे, अशी माहिती दिली. तसेच समाेरच्यावरही दबाव येताे. कमरेच्या वर गाेळीबार करण्याचा अादेश दिला हाेता, हे म्हणणे खाेटे असून, अापल्यासमाेरच गाेळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दंगलीला कुठून सुरुवात झाली? ती विशिष्ट भागात सीमित राहून तेथेच शमवण्यात अाली. शहरातील इतर भागात त्याचे पडसाद उमटू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही देण्यात अाली. उलटतपासणीतही देशपांडे यांना विविध प्रश्न विचारण्यात अालेे. या प्रकरणातील प्रदीप देशपांडे यांची साक्ष ही सर्वात महत्त्वाची मानली जात अाहे. साक्षसाठी गेल्या अाठ िदवसांपासून प्रदीप देशपांडे हे शहरात मुक्काम ठाेकून हाेते.
देशपांडेंच्या भेटीसाठी गर्दी...
पाेलिसअधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अापल्या कार्यकाळात अनेकांशी चांगले संबंध निर्माण केले हाेते. ते साक्षसाठी शहरात अाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस दलातील अधिकाऱ्यांसह इतरही क्षेत्रातील व्यक्तींनी हिरे मेडिकल काॅलेज अाणि पाेलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.