आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाड्याची टॅक्सी पळवण्याचा, डाव चालकाने हाणून पाडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबई,पुण्यातून ऑनलाइन टॅक्सी सर्व्हिसेसमध्ये फोनवर महागड्या कार भाड्याने घ्यायच्या अाणि निर्जनस्थळावर चालकाला उतरवून कार घेऊन पोबारा करायचे प्रकार वाढले आहेत. असाच एक चोरीचा प्रयत्न कार चालकाच्या समयसूचकतेमुळे शनिवारी फसला. दिवसभर शहरात कार फिरवल्यानंतर अखेर चालकाने भामट्याला एमअायडीसी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. 
मुंबईतील “मेरू’ टॅक्स्कॅन’ला फोन करून वैभव सतीश पकले (वय ३६) याने मुंबईतील भिवंडी नाका ते जळगावपर्यंत टॅक्सी भाड्याने केली. पहाटे वाजता चालक जाकीर काझी टॅक्सी (क्र. एमएच-०३-बी सी-३२९२) घेऊन आला. कार कसाराजवळ आल्यावर आई-पत्नी, मुलांचा अपघात झाल्याचे सांगून तातडीने जायचे सांगत त्याची सहानुभूती मिळवली. चालक काझीनेही अपघातस्थळी जायचे म्हणून कुठेही थांबता कार चालवली. मुंबई ते जळगावपर्यंतच्या सर्व टोल नाक्यांचे पैसे आणि डिझेलही त्यानेच भरले. जळगावी आल्यावर आपल्याकडे पैसेच नसल्याचे वैभव याने सांगितले. जळगाव शहरात सकाळपासून कार घेऊन इकडून-तिकडे फिरवली. मात्र, पैसेही काढून दिले नाही. नंतर परत मुंबई जाण्याचे सांगू लागल्याने कंटाळलेला टॅक्सीचालक काझीने कार थेट एमअायडीसी पोलिस ठाण्यात आणून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. घडल्या प्रकाराचा घटनाक्रम गेल्या सहा महिन्यांत एमअायडीसी पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांसारखाच असल्याने पोलिस सखोल चौकशी करीत आहे. 

चहा-नाश्तासिगारेटही चालकाकडून : भिवंडीनाका येथून वैभव कारमध्ये बसला. आई, पत्नी मुलांचा भूल करण्याचा प्रयत्न 
अपघात झाल्याचे सांगून खिशात पैसे नसल्याचेही म्हणाला. मात्र, माणुसकीच्या नात्याने झोपता रात्रभर कार चालवून जळगावात आणले. वाटेतील सर्व नाक्यांचे पैसे दिले. जळगावला आल्यावर रेल्वेस्थानकावर घेऊन गेला. येथे नातेवाईक येणार असल्याचे सांगत त्याने चार तास कार तेथेच उभी केली. मात्र, कुणी आलेच नाही. या वेळी चालक काझी याने चहा-नाश्ता, सिगारेटचाही खर्च केला. 

हुशारीने वाचली कार 
चालककाझी याने सलग साडेचारशे किलोमीटरपर्यंत कार चालवून आणली. वाहन थांबले तरी, चावी काढून पुन्हा तोच गाडीवर बसायचा. वैभवने वारंवार ‘तुम्ही झोपून जा...’ ‘मी कार चालवतो...’ असेही सांगितले. मात्र, त्याने त्याचे एेकले नाही. एके ठिकाणी त्याने कारचे टायर पंक्चर झाल्याचे सांगितले. तसेच चहासाठी थांबण्याचा अाणि पैसे घेऊन येण्याचा बहाणाही केला. मात्र, कारचालक काझीने त्याचे कुठलेही म्हणणे ऐकले नाही. पूर्ण प्रवासात गाडी चालवण्याची एकही संधी दिली नाही. 

चालकाने गाडीची किल्ली कायम स्वत: जवळ ठेवली. 
केस नं. : २९डिसेंबर : लग्नाचे कारण सांगून पळवली कार... नवी मुंबई येथील देवांग सतीशभाई रावल (वय २७) यांची कार (क्र. जीजे-०९, बीडी-१८१७) जामनेर येथे लग्नाला जाण्यासाठी वाशी येथून भाड्याने घेतली हाेती. २९ डिसेंबर रोजी मध्यरात्री विटनेर गाव शिवारातील नेरी-वावडदा रस्त्यावर अाल्यानंतर कार घेऊन पाेबारा केला होता. 

केस नं. : ंमार्च: पत्नीला आणण्यासाठी भाड्याने कार... मुंबई येथील शंभू विश्वनाथ घाेष यांच्या मालकीची कार (एम.एच. ०३ सीअार १८८७) दाेन जणांनी जामनेर येथे जाण्यासाठी मार्च राेजी फोन करून गाडी भाड्याने घेतली. कल्याण भिवंडी नाक्यावरून दोघे गाडीत बसले. त्यांनी भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. जळके शिवारात गाडी आल्यावर काही अंतरावर एका भामट्याने पाण्याची बाटली खाली फेकली. आणि नंतर मोबाइलही खाली पडल्याचे सांगून चालक विक्रमला खाली उतरून माेबाइल अाणण्यासाठी सांगितले. चालक खाली उतरल्यानंतर कार घेऊन चाेरटे सुसाट वेगात औरंगाबादच्या दिशेने पळून गेले हाेते. 

चालकाला उतरवून कार पळवण्यासाठी तीन बहाणे 
टॅक्सीचालकाची समयसूचकता अशी दिसली 
यापूर्वीच्या घटनांमध्ये चालक कसे फसले 
भाड्यानेकार घेऊन ती पळवण्याच्या घटना यापूर्वीही झाल्या.त्यावेळी लघुशंका,मोबाइल पडला अथवा अन्य कारणे सांगून भामटा प्रवासी चालकाला गाडीतून खाली उतरवून देत असे आणि चालक गाडीखाली उतरायचा. मात्र, किल्ली गाडीलाच असल्याने चोरटे कार घेऊन पसार झाले होते.ही चूक चालक जाकीर काझी यांनी टाळली. 


 
बातम्या आणखी आहेत...