आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलांविरुद्ध मोर्चा, घेराव, दिवसभर दिला ठिय्या; घरकुलांसाठी समर्थकांनी रात्री शिजविली खिचडी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिक्रमित घरे काढायला सांगताच मनपात धडकलेल्या महिलांनी घातला घेराव. - Divya Marathi
अतिक्रमित घरे काढायला सांगताच मनपात धडकलेल्या महिलांनी घातला घेराव.
धुळे - अपार्टमेंट मधीलघरे लहान असतात म्हणून अाम्हाला अपार्टमेंट नकाे; पण जिथे राहताे तिथेच जमिनीवरील घरे बांधून द्या म्हणत नागरिकांनी थेट महापालिकेत माेर्चा अाणला. या वेळी घरे रिकामी करण्याची नाेटीस देणाऱ्या नंदू बैसाणे यांना घेराव घातला. मनपाचा घाेळ पाहून अावारातच ठिय्या दिला. त्यानंतर सायंकाळी घरकुलांच्या बाजूने असलेल्या नागरिकांनी मनपा आवारातच थांबण्याचा निर्णय घेऊन ‘बिऱ्हाड’ थाटले. त्यानंतर दुसऱ्या गटाने सायंकाळी खिचडी शिजवून दोन दिवसांसाठी ठिय्या दिला. 
 
सकाळच्या सुमारास नागरिकांचा संताप पाहून अायुक्तांशी चर्चा करण्यात अाली. त्यानंतर शासकीय निधीतून अपार्टमेंटच बांधावे लागेल, असे महापालिकेत एकीकडे नागरिकांनी ठिय्या दिलेला असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनीही ‘काम बंद’ अांदाेलन केले. यात दिवसभर अावारात कर्मचारी ठिय्या देऊन बसून हाेते. यामुळे दिवसभर महापालिकेची कामे खाेळंबली. मात्र, कर्मचाऱ्यांची समन्वय संघटना कायदेशीर नाही. त्यामुळे सोमवारची बिनपगारी रजा धरण्यात
येईल, असे पत्र आयुक्तांनी दिले. 
 
महापालिका कर्मचाऱ्यांनी वेतन फरकांची मागणी केली. त्यात सहाव्या वेतन अायोगाचा फरक देण्यात आला, तर पाचव्या वेतन आयोगाचा फरक मनपा फंडातील कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यात वैद्यकीय भत्त्यापाेटी प्रारंभी बाराशे रुपये देण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यानंतर एक हजार रुपयेच मंजूर केले. रोजंदारी कर्मचाऱ्यांना दरवाढ लागू केली नाही म्हणून सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन झाले. कर्मचाऱ्यांनी मनपाच्या आवारात ठिय्या दिला. यामुळे कार्यालयात शुकशुकाट होता. संघटनेचे पदाधिकारी सुनील देवरे, भानुदास बगदे प्रसाद जाधव उपस्थित होते. दिवसभरात सांगत अायुक्त धायगुडे यांनी नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दाेन दिवसांची मुदत दिली. याच मुदतीवरून घरकुलांच्या बाजूने असलेला दुसरा गट खवळल्याचे दिसून आले. शहरातील जुने धुळे परिसरातील नव्या भिलाटीत अतिक्रमित घरे अाहेत. याच जागेवर घरकुले बांधली जाणार अाहेत. बहुमजली इमारतीत नागरिकांना सामावून घेतले जाईल; परंतु शंभरापेक्षा अधिक नागरिकांनी घरकुलांना विरोध केला. स्थानिकांचा विरोध असतानाही मनपा प्रशासनाने घरे पाडण्याचा प्रयत्न केला. सोमवारीही अतिक्रमण विभागातर्फे घरे पाडण्याची सूचना नंदू बैसाणे यांनी दिली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेत धाव घेत नंदू बैसाणे यांना घेराव घातला. त्यानंतर मनपा आवारात ठिय्या दिला महापौरांशीही चर्चा करण्यात आली. या वेळी महापौर कल्पना महाले, चंद्रकांत सोनार, आयुक्त संगीता धायगुडे, अभियंता कैलास शिंदे तसेच नागरिकांचे प्रतिनिधी एकनाथ अहिरे, देवसिंग सोनवणे, दीपक अहिरे, पंडित पवार, सुरेश वाघ उपस्थित हाेते. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी घरकुल नकाेच, अशी भूमिका घेतली. यावर आयुक्त संगीता धायगुडे यांनी हा भाग अतिक्रमित अाहे जागा महापालिकेची आहे. मात्र, शासनाच्या योजनेत येथे घरकुले बांधताना अपार्टमेंटच बांधता येणार आहे. त्यामुळे जागा रिकामी करून द्यावी अथवा नियमाप्रमाणे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, लाभार्थ्यांनी घरे काढताना सर्व भागातील घरे काढण्याचा आग्रह धरला. आमचीच घरे का काढत आहात? त्याकरिता संपूर्ण जागेचे मोजमाप करावे. यात रो-हाऊस बसते काय ते पाहावे, अशी मागणीही केली; परंतु या भागाचे सर्वेक्षण करून बांधकामासाठी जागा ठरली अाहे. प्रारंभी बांधकाम केल्यानंतर उर्वरित जागेवरील अतिक्रमण काढण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्याकरिता जागा रिकामी करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनावर शंभर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
 
मनपा कर्मचाऱ्यांचाही ठिय्या.... 
प्रशासनाशी चर्चा झाली नाही. यात वसुली विभागाचे कर्मचारीही सहभागी झाले. तसेच नगररचना विभागातही काम झाले नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले. दुसरीकडे आयुक्त संगीता धायगुडे यांनी संघटनेला नोटीस पाठविली. मात्र, ती पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही. यात त्यांनी पाचव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ३० हजार रुपये देण्याचे रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीत वाढ लागू करण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मिळताच कायदेशीर कार्यवाही हाेणार आहे. तसेच संघटना ही कायदेशीर नाही. त्याकरिता आंदोलन मागे घेण्यात यावे. मागे घेतल्यास सोमवारी बिनपगारी रजा करण्यात येत अाहे. त्याचप्रमाणे ‘काम बंद’मुळे मनपाची प्रतिमा डागाळल्याने आर्थिक नुकसान झाल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. 

नागरिकांनी मांडली भूमिका 
-कुटुंबाला सामावून घेऊ शकत नाही ते अपार्टमेंट नकाेच. 
- परिवारात वृद्ध लाेक आहेत. त्याचप्रमाणे कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या कुठे ठेवणार? 
- एकत्र कुटुंब पद्धत असल्याने परिवारही मोठे आहेत. 
-बहुमजली इमारतीत मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. 
- सर्वेक्षण करताना त्यात ज्यांचे वास्तव्य नाहीत, त्यांचीही नावे लाभार्थ्यांमध्ये घुसडली अाहेत. 
- घरकुल याेजनेतील बहुतांश घरकुले अद्याप रिकामी आहेत. 

पोलिस बंदोबस्त 
महापालिकेच्या आवारात ‘काम बंद’ आंदोलन सुरू होते. त्यातच नवी भिलाटी येथील लाभाथ्यांनीही ठिय्या आंदोलन केले. या वेळी मनपाच्या आवारात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता, तर महापौरांच्या दालनातही पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, घरकुलांसाठी  मोर्चा, घेराव...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...