आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटमधील हाॅकर्सच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - फुले मार्केटमधील हाॅकर्सवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रविवारी अचानक धडक कारवाई केली. त्यामुळे रविवारपाठाेपाठ साेमवारी देखील मार्केटमधील पाथवे माेकळा राहिला. कारवाई करून प्रकरण संपवता अाता प्रशासनाने हाॅकर्सच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली अाहेे. निवडणूक अाटाेपताच पर्यायी जागांवर व्यवस्था करण्यात येणार अाहे. 
जळगावकरांसाठी हक्काची बाजारपेठ असलेल्या फुले मार्केटमधील हाॅकर्सची समस्या प्रचंड वाढली. हाॅकर्ससंदर्भात वाढलेल्या तक्रारींमुळे महापालिकेने रविवारी अचानक पथकाच्या माध्यमातून कारवाई केली हाेती. या वेळी मार्केटमधील पाथ वे वरील हाॅकर्सच्या पेट्या हातगाड्या ताब्यात घेतल्या हाेत्या. त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस हाॅकर्समुक्त राहिला. हिच स्थिती साेमवारी देेखील कायम हाेती. दरम्यान, कारवाई करून हातावर हात धरून बसता पालिका प्रशासनाने अाता हाॅकर्सच्या पर्यायी जागेवर स्थलांतराच्या प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला अाहे. 

हॉकर्संसाठी शहर पोलिस ठाण्याला लागून असलेली नियोजित जागा. 

चार जागांवर स्थलांतर 
फुले मार्केटमधील २२३ हाॅकर्सने १०० रुपयांची पावती घेतल्याने त्यांना नाेंदणीकृत या नात्याने जागा देण्यात येणार अाहे. यासाठी हाॅकर्सची यादी तयार करून साेडत पद्धतीने जागा निश्चित केली जाणार अाहे. यासाठी शहर पाेलिस स्टेशन ते जिल्हा परिषदेपर्यंतच्या रस्त्यावर ९७, जुन्या नगरपालिकेच्या मागील राेडवर दाेन्ही बाजूने ५१, खान्देश मिल युनियनच्या कार्यालयाजवळील जागेत १५ तसेच कबुतर खाना येथे ६० हाॅकर्सची व्यवस्था केली जाणार अाहे. 

निवडणुकीनंतर गती 
रविवारच्या कारवाईनंतर अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान पथकाने फुले मार्केट परिसराची पाहणी केली. तसेच अायुक्त जीवन साेनवणे यांची भेट घेऊन माहिती दिली. अायुक्तांनी हाॅकर्सच्या स्थलांतराबाबत प्रस्ताव सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात अाली अाहे. त्यामुळे पुढच्याच अाठवड्यात हाॅकर्स स्थलांतराची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता अाहे. 
अतिक्रमण काढल्यावर मोकळा झालेला फुुले मार्केटचा परिसर. 
 
बातम्या आणखी आहेत...