आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानाचे वीजमीटर जाळणारा ताब्यात, गांधी मार्केटमधील प्रकार सीसीटिव्हीमुळे उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गांधी मार्केटमधील दुकानाचे मीटर जळाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस अाला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका माथेफिरूने ते जाळल्याचे समाेर अाले हाेते. त्याला पाेलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. 
 
गांधी मार्केटमधील दुकान क्रमांक विजय पंढरीनाथ शिंपी (वय ३८, रा. शिवाजीनगर) यांच्या मालकीचे अाहे. त्यात त्यांचे टेलरींगचे दुकान अाहे. बुधवारी रात्री वाजता नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघून गेले. गुरुवारी सकाळी १० वाजता दुकान उघडून त्यांनी लाइट लावले. मात्र, लाइट सुरूच झाले नाही. त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक मीटरजवळ येऊन बघितले. तर मीटर जळालेले दिसले. 
 
मीटर काेणीतरी हेतूपुरस्सर जाळल्याची त्यांना संशय अाला. त्यामुळे त्यांनी शहर पाेलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती दिली. त्यावरून शहर पाेलिस ठाण्याचे रतनहरी गिते, भूषण नेतकर यांनी घटनास्थळाची तपासणी केली. शिंपी यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात रात्री ११.४३ मिनिटांनी एक तरुण मीटर ताेडून जाळून टाकत असल्याचे फुटेज मिळाले.
 
फुटेज व्यवस्थित बघितल्यानंतर ताे गांधी मार्केटमध्ये फिरणारा साेमनाथ सुभाष काेळी (वय २८, रा. गेंदालाल मिल) असल्याचे स्पष्ट झाले. पाेलिसांनी त्याचा शाेध घेतला असता, ताे मार्केटमध्येच फिरत हाेता. त्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...