आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका गणपतीच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणुकांना होणार सुरुवात, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी रविवारी महापालिका, शिवतीर्थ ते मेहरूण तलाव या गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. या वेळी त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनपा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. 
 
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, प्रभारी महापौर ललित कोल्हे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, अमित भाटिया, सुशील नवाल, डॉ. रितेश पाटील, नितीन रेदासनी, डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते. तसेच या वेळी झालेल्या बैठकीत साेमवारी दुपारी वाजता शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा नियोजन भवनात आयोजित करणे. सकाळी १० वाजता मनपाच्या गणपतीची आरतीने शिवतीर्थ येथून मिरवणूक सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 
 
जळगाव शहर निर्माल्य संकलन माेहिमेत रविवारी मेहरुण तलाव परिसर, गणेशघाट येथे अाजवर झालेल्या गणपती विसर्जनाचे निर्माल्य संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात अाला. सुमारे १२ टन निर्माल्य संकलित करण्यात अाले. सकाळी वाजेपासून ही माेहीम राबविण्यात अाली. यात दिलीप शिंपी, शरद जाेशी, स्वप्नील पाटील, दिलीप नेतलेकर, दीपक खंबायत, पंकज जाधव अादीसह मल्टी मीडीयाचे सर्व सहकारी यांनी परिसर स्वच्छ केला. साेमवारीही निर्माल्य संकलनाची माेहिम राबविण्यात येणार अाहे. यासाठी सकाळी ते संध्याकाळी यावेळेत संपूर्ण शहरात ३२ संकलन केंद्र प्रत्येक गल्लीत निर्माल्य संकलन रथाच्या माध्यमातून निर्माल्य संकलीत करण्यात येणार अाहे. यासाठी ४० कचरा वेचणाऱ्या भगिनी पर्यावरण पूरक कार्यात सेवा बजावणार अाहे. त्याशिवाय शहरातील विविध शैक्षणिक सामाजिक संस्था यात सहभागी हाेणार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...